-
यंदाच्या बहुचर्चित चित्रपटांपैकी एक असलेला किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ हा चित्रपट २०२५ च्या ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी भारताकडून अधिकृतरित्या पाठवण्यात येणार आहे. चेन्नई येथे आयोजित एका कार्यक्रमात ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने ९७ व्या ऑस्कर पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट स्पर्धा विभागासाठी भारताकडून ‘लापता लेडीज’ या चित्रपटाची निवड करण्यात आली असल्याची घोषणा केली आहे. एकूण २९ चित्रपटांवर मात करत हा सिनेमा नामांकन मिळवण्यात यशस्वी झाला आहे. दरम्यान इतर चित्रपट कोणते होते आणि ते कुठे पाहता येतील हे जाणून घेऊ.
-
1- हनु-मान Hanu-Man (तेलगू)
अकादमी पुरस्कारांच्या प्राथमिक यादीत हनुमान हा तेलगू चित्रपटही होता, हा चित्रपट जिओ सिनेमा, Hotstar आणि Zee5 वर पाहता येईल. (Photo- Zee5) -
लापता लेडीज (हिंदी)
‘लापता लेडीज’ या चित्रपटाने यंदाच्या ऑस्करमध्ये नॉमिनेशन मिळवले आहे. हा चित्रपट तुम्ही Netflix या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. (Still From Film) -
Chhota Bheem And The Curse of Damyaan (हिन्दी)
हा हिंदी चित्रपटही शर्यतीत होता, हा चित्रपट तुम्ही Netflix या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. (Still From Film) -
कल्की 2898 एडी (तेलगू)
‘कल्की २८९८ एडी’ हा प्रभासचा दमदार सिनेमाही या यादीत होता. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओवर -
Good Luck (हिंदी)
गुड लक हा प्रसिद्ध चित्रपटही यस प्राथमिक यादीमध्ये समाविष्ट होता, हा चित्रपट तुम्ही Disney+ Hotstar वर पाहू शकता. (Still From Film) -
Gharat Ganpati (मराठी)
घरत गणपती हा मराठी चित्रपट या यादीत होता, हस चित्रपट Prime Video वर पाहता येईल. -
Kill (हिंदी)
किल हा अल्पावधीतच चर्चेत आलेला चित्रपट देखील या यादीमध्ये होता, हा तुम्ही Disney+ Hotstar वर पाहू शकता. (Still From Film) -
Animal (हिंदी)
अॅनिमल चित्रपट देखील या प्राथमिक यादीत सामील होता, हा चित्रपट तुम्ही Netflix वर पाहू शकता. (Still From Film) -
Srikanth (हिंदी)
श्रीकांत हा चित्रपट यादीतील पुढचा चित्रपट असून Netflix वर उपलब्ध आहे. (Still From Film) -
Aaattam (The Play) (मल्याळम)
आट्टम हा मल्याळम चित्रपट खूप चर्चेत होता, या चित्रपटलाही या प्राथमिक यादीमध्ये स्थान मिळाले होते. हा चित्रपट तुम्ही Prime Video वर पाहू शकता. (Still From Film) -
Chandu Champion (हिंदी)
चंदू चॅम्पियन हा चित्रपट Prime Video वर पाहू शकता. (Still From Film) -
Kottukkaali (तमिळ)
यादीतील पुढील चित्रपट आहे कोट्टूकली, हा तमिळ चित्रपट Simply South या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत्या २७ सप्टेंबर पासून पाहता येणार आहे. (Still From Film) -
Maharaja (तमिळ)
विजय सेतुपतीचा महाराजा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता, या चित्रपटानेही या यादीत स्थान मिळवले होते, Netflix वर हा सिनेमा उपलब्ध आहे. (Still From Film) -
Joram (हिंदी)
जोरम हा मनोज वाजपेयी अभिनीत हिंदी सिनेमा या प्राथमिक यादीमध्ये होता, हा सिनेमा तुम्ही Prime Video वर पाहू शकता. (Still From Film) -
Maidaan (हिंदी)
अजय देवगण अभिनीत मैदान हा चित्रपटही चर्चेत राहीला होता, हा चित्रपट तुम्ही Prime Video वर पाहू शकता. (Still From Film) -
Sam Bahadur (हिंदी)
सॅम बहादूरनेही समीक्षकांची वाहवा मिळवली होती, विकी कौशलचा उत्तर अभिनय तुम्ही झी फाईव वर पाहू शकता. (Still From Film) -
Ullozhukku (मल्याळम)
उलोझुक्कू हा मल्याळम चित्रपट तुम्ही Prime Video पाहू शकता. (Still From Film) -
Mangalavaaram (तेलगू)
मंगलावरम या चित्रपटाचा आनंद तुम्ही Disney+ Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर घेऊ शकता. (Still From Film) -
Aadujeevitham (मल्याळम)
आदूजीविथम हा मल्याळम सिनेमा Netflix वर उपलब्ध आहे. (Still From Film) -
Jigarthanda Double X (तमिळ )
जिगरठंडा हा तमिळ चित्रपट Netflix वर उपलब्ध आहे. (Still From Film) -
Swatantrya Veer Savarkar (हिंदी)
रणदीप हुडाचा बहुचर्चित चित्रपट या यादीमध्ये सामील होता. हा चित्रपट तुम्ही Zee5 वर पाहू शकता. (Still From Film) -
Thangalaan (तमिळ)
पा. रंजीत दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता विक्रमने अभिनय केला आहे. हा चित्रपट Netflix वर उपलब्ध होणार आहे. (Still From Film) -
Jama (तमिळ)
जामा हा तमिळ चित्रपट Prime Video वर उपलब्ध आहे. (Still From Film) -
Vaazhai (तमिळ)
वाझाई हा चित्रपट Disney+ Hotstar वर उपलब्ध आहे. (Still From Film) -
Swargandharva Sudhir Phadke (मराठी)
स्वरगंधर्व सुधीर फडके हा मराठी चित्रपटही या प्राथमिक यादीत समाविष्ट होता, तर या चित्रपटाचा आनंद तुम्ही Prime Video या प्लॅटफॉर्मवर घेऊ शकता. (Still From Film) -
Article – 370 (हिंदी)
आर्टिकल ३७० हा चित्रपट Netflix वर पाहता येईल. (Still From Film) -
Ghaath (मराठी)
गाठ हा मराठी चित्रपटही या यादीमध्ये सामील आहे. या चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी अभिनय करताना दिसत असून हा चित्रपट २७ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.(Still From Film) -
Aabha (ओडिया)
आभा हा ओडिया भाषेतील चित्रपट १३ सप्टेंवर रोजी प्रदर्शित झाला आहे. तुम्ही हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये पाहू शकता. -
All We Imagine as Light (मल्याळम) – ऑल वी इमॅजीन अॅज लाईट हा सिनेमाही या प्राथमिक यादीमध्ये निवडण्यात आला होता, दरम्यान हा चित्रपट सध्यातरी कोणत्याही ओटीटीवर उपलब्ध झालेला नाही. (Still From Film)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”