-
दमदार स्टारकास्ट, पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या ‘नवरा माझा नवसाचा २’ (Navra Maza Navsacha 2) या चित्रपटाला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला आहे.
-
‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद हा मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या ओपनिंग्जपैकी आहे.
-
सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवादलेखन संतोष पवार यांचं आहे.
-
या चित्रपटात अभिनेत्री हेमल इंगळेने (Heymal Ingley) ‘श्रद्धा’ची भूमिका साकारली आहे.
-
हेमलने दिग्दर्शक मनोज विशे यांच्या ‘आस’ चित्रपटातून पदार्पण केले होते.
-
हेमलने ‘मिस अर्थ इंडिया’ (Miss Earth India) हा प्रतिष्ठित किताब मिळवला आहे.
-
हेमलने सातासमुद्रापार अमेरिकेत होणाऱ्या ‘मिस अर्थ वर्ल्ड’ (Miss Earth World) या जागतिक सौंदर्यस्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
-
दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांच्या ‘अशी ही आशिकी’ (Ashi Hi Aashiqui) या चित्रपटातून हेमल प्रसिद्धीझोतात आली होती.
-
काही दिवसांपूर्वी हेमलचा साखरपुडा (Engagement Ceremony) पार पडला.
-
साखरपुड्यातील काही फोटो हेमलने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : हेमल इंगळे/इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख