-
Urmila Matondkar Divorce : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने घटस्फोटासाठी अर्ज दिल्याची माहिती समोर आली आहे.
-
उर्मिला पती मोहसीन अख्तर मीरपासून विभक्त होणार आहे.
-
मराठमोळ्या उर्मिलाने आठ वर्षांपूर्वी काश्मिरी व्यावसायिक व मॉडेल असलेल्या मोहसीनशी आंतरधर्मीय लग्न केलं.
-
राजकारणी व अभिनेत्री उर्मिला ५० व्या वर्षी पतीपासून विभक्त होत आहे.
-
वयात १० वर्षांचे अंतर असूनही दोघांनी आंतरधर्मीय लग्न केले होते.
-
उर्मिला व मोहसीन यांची लव्ह स्टोरी जाणून घेऊयात.
-
उर्मिला व मोहसीन यांची भेट त्यांचा मित्र आणि बॉलीवूड डिझायनर मनीष मल्होत्रा मार्फत झाली होती.
-
मनीष मल्होत्राची भाची रिद्धीच्या लग्नात उर्मिला व मोहसीन यांची भेट झाली होती.
-
मोहसीनला पहिल्या भेटीतच उर्मिला खूप आवडली होती.
-
त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या.
-
नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
-
मोहसीनने उर्मिलाला लग्नासाठी प्रपोज केलं, पण उर्मिला तयार नव्हती.
-
मोहसीनने प्रयत्न सोडले नाही आणि अखेर उर्मिलाने लग्नासाठी होकार दिला.
-
अखेर मोहसीन व उर्मिला ३ मार्च २०१६ रोजी लग्नबंधनात अडकले.
-
दोघांनी खासगी समारंभात लग्न केलं होतं.
-
त्यांच्या लग्नात फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.
-
या लग्नात फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा उपस्थित होता.
-
उर्मिला व मोहसीन यांच्या वयात १० वर्षांचे अंतर आहे.
-
उर्मिला ५० वर्षांची आहे, तर मोहसीन ४० वर्षांचा आहे.
-
मोहसीन हा मूळचा काश्मिरचा आहे. तो व्यावसायिक आणि मॉडेल आहे.
-
मोहसीनने ‘इट्स अ मॅन्स वर्ल्ड’, ‘लक बाय चान्स’, ‘मुंबई मस्त कलंदर’ आणि ‘बी.ए. पास’ चित्रपटांमध्ये काम केलंय. (सर्व फोटो – मोहसीन अख्तर मीर इन्स्टाग्राम)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल