-
सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा २’ (Navra Maza Navsacha 2) हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
-
नवस फेडण्यासाठी जातानाचा रेल्वे प्रवास, त्यात होणाऱ्या गमतीजमती या चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे.
-
अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar) या चित्रपटात ‘भक्ती’ची भूमिका साकारत आहेत.
-
सुप्रिया यांच्याबरोबर या चित्रपटात अभिनेते सचिन पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी आणि हेमल इंगळे अशी मोठी स्टारकास्ट आहे.
-
या चित्रपटात सोनू निगम, जॉनी लिवर, श्रिया पिळगांवकर हे पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत आहेत.
-
काही दिवसांपूर्वी सुप्रिया यांनी ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वात (Bigg Boss Marathi Season 5) हजेरी लावली होती.
-
‘बिग बॉस’च्या शोसाठी सुप्रिया यांनी आकाशी रंगाची कॉटन पैठणी साडी (Sky Blue Paithani Saree) नेसली होती.
-
पैठणी साडीतील फोटोंना सुप्रिया यांनी ‘Dressed In Six Yards Of Pure Grace’ असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुप्रिया पिळगांवकर/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”