-
OTT प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट उपलब्ध आहेत. पण आज आपण नेटफ्लिक्सच्या त्या भारतीय चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत जे सत्य घटनांवर आधारित आहेत. (फोटो: नेटफ्लिक्स)
-
महाराजा : हा चित्रपट गुजरातचे लेखक, कवी, पत्रकार आणि समाजसुधारक करसनदास मुळजी यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटातून आमिर खानचा मुलगा जुनैद खानने मोठ्या पडद्यावर एन्ट्री केली आहे. (फोटो: नेटफ्लिक्स)
-
अमर सिंह चमकिला : पंजाबचे प्रसिद्ध गायक अमर सिंह चमकिला यांची 1988 मध्ये हत्या करण्यात आली होती. हा चित्रपट त्यांच्या जीवनावर आधारित आहे. (फोटो: नेटफ्लिक्स)
-
83: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्यावर आधारित 83 हा चित्रपट नेटफ्लिक्सवरही पाहता येईल. यात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. (फोटो: नेटफ्लिक्स)
-
पानिपत: हा चित्रपट 18 व्या शतकातील भारतातील अफगाण आक्रमण आणि मराठ्यांच्या युद्धावर आधारित आहे. (फोटो: नेटफ्लिक्स)
-
सूरमा: भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार संदीप सिंग यांच्या जीवनावर आधारित सूरमा चित्रपटात दिलजीत दोसांझने त्यांची भूमिका साकारली आहे. (फोटो: नेटफ्लिक्स)
-
संजू : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित संजू हा चित्रपट नेटफ्लिक्सवरही पाहता येईल. यात त्याची भूमिका रणबीर कपूरने साकारली आहे. (फोटो: नेटफ्लिक्स)
-
शाबाश मिथू: हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज हिचा चरित्रपट आहे ज्यामध्ये तिची भूमिका तापसी पन्नूने साकारली आहे. (फोटो: नेटफ्लिक्स)
-
द स्काय इज पिंक: या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा मोटिव्हेशनल स्पीकर आयेशा चौधरीच्या जीवनावर आधारित आहे. (फोटो: नेटफ्लिक्स)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही