-
बिग बॉसच्या घरात स्पर्धकांची एकमेकांबरोबर जी समीकरणे असतात, त्याचीदेखील मोठी चर्चा होताना दिसते. (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)
-
अरबाज आणि निक्कीविषयीदेखील मोठी चर्चा झालेली पाहायला मिळाली. (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)
-
आता नुकताच अरबाज पटेल कमी मतं मिळाल्यामुळे घराबाहेर पडला आहे. (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)
-
बिग बॉस मराठी ५ मधून बाहेर पडल्यानंतर अरबाज पटेलने निक्की तांबोळीविषयी वक्तव्य केले आहे. (फोटो सौजन्य: निक्की तांबोळी इन्स्टाग्राम)
-
अरबाज पटेलने नुकतीच ‘अल्ट्रा बझ मराठी’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्याने म्हटले, “जे लोक मला निक्कीविषयी बोलत आहेत. तर मला वाटतं की ठीक आहे, जी मुलगी तुम्हाला आवडते, तिच्यासाठी तुम्ही काही गोष्टी करता, त्यात चुकीचे काय आहे.” (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)
-
“तिच्यासाठी माझ्या मनात भावना आहेत.” (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)
-
“त्या घरात निक्की माझ्यासाठी कम्फर्ट झोन होती. तिच्याबरोबर माझं मन जोडललं होतं.” (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)
-
“आमच्या भांडणानंतर वॉशरुममध्ये आमच्यात बोलणं झालेलं. निक्की मला बाळासारखी ट्रीट करते. ते किती लोकांनी बघितलं किंवा दाखवलं माहीत नाही.” (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)
-
“तर तेव्हा मला वाटलं की आपण नॉर्मल वागू. आपण एकमेकांना टोमणे मारायला नको. जे मला आवडत नाही ते माझ्यासमोर करू नको, माझ्या पाठीमागे करायचं असेल तर करू शकते; असंच आमचं तिथे वॉशरूममध्ये बोलणं झालं होतं.” (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)
-
“पण, भाऊच्या धक्क्यावर मला जेव्हा सांगितलं की तू सहानुभूतीसाठी करतोय, त्यावेळी संपूर्ण घर माझ्याविरुद्ध झालं. त्यानंतर माझ्याकडे निक्कीने स्वत: येऊन गोष्टी सगळ्या स्पष्ट केल्या. (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर तिने मला कधीही त्रास दिला नाही. जिथे तुमच्या भावना असतात तिथे थोड्या कुरबुरी असतातच.” (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)
-
निक्की बाहेर आल्यावर जशी ती घरात होती तशीच माझ्याशी वागली तर आम्ही एकत्र दिसू, असे अरबाजने म्हटले आहे. (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स