-
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) लवकरच ‘फुलवंती’ (Phullwanti) या चित्रपटात झळकणार आहे.
-
पद्माविभूषण बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या ‘फुलवंती’ या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे.
-
प्राजक्ताने सोशल मीडियावर ‘फुलवंती’ चित्रपटातील ‘मदनमंजिरी’ (MadanManjiri) गाण्यामधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्राजक्ताने हिरव्या रंगाची नऊवारी साडी (Green Nauvari Saree) नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर प्राजक्ताने मराठमोळ्या दागिन्यांचा साज (Traditional Gold Jewellery) केला आहे.
-
प्राजक्ताने या फोटोंना ‘नटरंगी नार, तिची ठसकेबाज लावणी, गाजविण्या पेशव्यांचा दरबार, आली मदनमंजिरी’ असे कॅप्शन दिले आहे.
-
प्राजक्ताबरोबर या चित्रपटात मराठीतील नामवंत कलाकारांची फौज दिसणार आहे.
-
‘फुलवंती’ हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)

अमरावती ते मुंबई विमान प्रवासाचे वेळापत्रक, तिकीट दर जाहीर; फक्त…