-
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) लवकरच ‘मानवत मर्डर्स’ (Manvat Murders) या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.
-
‘मानवत मर्डर्स’ ही वेब सीरिज (Web Series) सत्य घटनेवर आधारित आहे.
-
रोमांचक थ्रिलर सीरिज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात १९७०च्या दशकात घडलेल्या क्रूर हत्याकांडाचा उलगडा करते.
-
या सीरिजमध्ये सईमध्ये सईने हत्या व फसवणूकीच्या जाळ्यात अडकलेली अडाणी मराठी महिला ‘समिंदरी’ची (Samindri) भूमिका साकारली आहे.
-
लक्षवेधक अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या सईने या भूमिकेमधील भावनिकतेला सादर करण्याबरोबरच अभिनेत्री म्हणून ही वैविध्यतेला दाखवली आहे.
-
सईने सोशल मीडियावर ‘मानवत मर्डर्स’च्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोला सईने ‘मी सेट वर खळखळून हसताना…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
ही वेब सीरिज सोनी लिव्हवर शुक्रवारी, ४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)

७ एप्रिल पंचांग: बुध मार्गी होऊन ‘या’ राशींना देणार प्रचंड धनलाभ आणि सन्मान; तुम्हाला कोणत्या मार्गे मिळेल आनंद; वाचा राशिभविष्य