-
Bigg Boss Marathi 5 च्या घरातून अरबाज पटेल नुकताच प्रेक्षकांची कमी मते मिळाल्यामुळे बाहेर पडला आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर त्याने मुलाखतींमधून अनेक खुलासे केले आहेत. (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)
-
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात ज्या जोडीची सर्वांत जास्त चर्चा झाली, ती जोडी निक्की आणि अरबाजची होती. (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)
-
त्यांच्यातील नात्याबद्दल, बॉण्डिंगबद्दलही त्याने वक्तव्य केले आहे. (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)
-
आता त्याने रितेश देशमुखबद्दल केलेले वक्तव्य चर्चेत आहे. (फोटो सौजन्य: रितेश देशमुख इन्स्टाग्राम)
-
‘व्हायरल बॉलीवूड’शी बोलताना त्याने रितेश देशमुखविषयी म्हटले, “मी जेव्हा एलिमिनेट झालो तेव्हा तिथे रितेशभाऊ नव्हते. (फोटो सौजन्य: रितेश देशमुख इन्स्टाग्राम)
-
त्यामुळे मला खूप दु:ख झाले. बिग बॉस मराठी ५ चा अंतिम सोहळा लवकरच पार पडणार आहे. (फोटो सौजन्य: रितेश देशमुख इन्स्टाग्राम)
-
त्यावेळी मी त्यांना भेटेन, खूप गोष्टी बोलायच्या आहेत. मी बाहेर येऊन बघितलं की, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने शो होस्ट केला. (फोटो सौजन्य: रितेश देशमुख इन्स्टाग्राम)
-
तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे शोचा टीआरपी चांगला आला आहे”, असे म्हणत रितेश देशमुखचे त्याने कौतुक केले आहे. (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)
-
याबरोबरच अरबाज पटेलने बिग बॉसच्या घरातील सदस्यांविषयी बोलताना म्हटले, “बिग बॉसच्या घरात ज्यांच्याशी भांडणे झाली आहेत, ती बाहेर असणार नाहीत. (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)
-
कारण- तो एक खेळाचा भाग होता. खरं जग हे वेगळं आहे. बाहेर मी सगळ्यांबरोबर बोलेन, त्यांना भेटेन. (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)
-
म्युझिक व्हिडीओ कधी येणार येणार, असे विचारताच अरबाजने, “निक्की बाहेर येऊ दे. आम्ही मिळून म्युझिक व्हिडीओ करू”, असे म्हटले आहे. (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)
-
निक्की त्याची खूप काळजी घ्यायची, त्या घरात ती त्याच्यासाठी ‘कन्फर्ट झोन’ होती, असे निक्कीबाबत बोलताना त्याने म्हटले आहे. (फोटो सौजन्य: अरबाज पटेल इन्स्टाग्राम)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई