-
सुप्रसिद्ध टीव्ही आणि बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉयचा काल २८ सप्टेंबर रोजी वाढदिवस होता आणि या खास प्रसंगी तिची जवळची मैत्रीण आणि बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीने सोशल मीडियावर मौनीला हृदयस्पर्शी पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
-
मौनीची अप्रतिम छायाचित्रे शेअर करून, दिशाने तिच्यासोबतचे तिचे अतूट नाते सुंदरपणे अधोरेखित केले, जे पाहून चाहते तिची प्रचंड प्रशंसा करत आहेत. दिशा पटानी आणि मौनी रॉय यांच्यातील मैत्री कोणापासून लपलेली नाही. दोघीही एकमेकांसोबत अनेक अविस्मरणीय क्षण घालवतात आणि त्यांचे बाँडिंग सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळते.
-
मौनीच्या वाढदिवशी, दिशाने एकत्र घालवलेल्या त्यांच्या सुट्टीतील काही खास क्षणांची छायाचित्रे शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये दोघींची मजबूत बाँडिंग स्पष्टपणे दिसत आहे. दिशा पटानीने या फोटोंसोबत मौनी रॉयसाठी एक सुंदर आणि भावनिक नोटही लिहिली आहे.
-
तिने मौनीला तिची बहीण म्हटले आणि लिहिले, “माझ्या सर्वात तेजस्वी स्टार मॉन्झूला (Monzu) वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या आयुष्यात खूप आनंद आणल्याबद्दल धन्यवाद, तू माझी बहीण आहेस. माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे.”
-
या नोटमुळे दोघांमधील मैत्री आणि घट्ट नाते आणखी दिसून येते, त्यामुळे यावर चाहत्यांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या. दिशा पटानी आणि मौनी रॉय यांच्या फोटोंवर चाहते सतत प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
-
मौनीचा गोंडसपणा आणि दिशाचा गोडवा सोबतच त्यांच्या निखळ मैत्रीने सर्वांची मनं जिंकली आहेत. या फोटोंना आणि दिशाच्या नोटवर चाहते रंजक प्रतिक्रिया देत आहेत आणि या दोन बहिणीच्या खास स्टाइलचे कौतुक करत आहेत.
-
दिशाने मौनीसोबत असे खास क्षण शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही दिशाने मौनीसोबतचे तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यामध्ये त्यांची खास मैत्री आणि परस्पर समंजसपणाचे अप्रतिम क्षण पाहायला मिळाले होते.
-
(Photos Source: @dishapatani/instagram)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख