-
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या अंतिम आठवड्याला सुरुवात झाली आहे.
-
अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार आणि वर्षा उसगांवकर हे सदस्य अंतिम आठवड्यापर्यंत पोहोचले आहेत. या सात जणांपैकी एक जण ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरणार आहे.
-
‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमाचे चाहते अनेक लोकप्रिय कलाकार आहेत. हे सातत्याने बिग बॉस पाहून आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे व्यक्त करत असतात.
-
पुष्कर जोग, उत्कर्ष शिंदे, विशाखा सुभेदार, सुरेखा कुडची, सिद्धार्थ जाधव, मिरा जगन्नाथ असे बरेच कलाकार ‘बिग बॉस मराठी’मध्ये चालू असणाऱ्या गोष्टींबाबत पोस्ट करत असतात.
-
अलीकडेच सई ताम्हणकरने ‘बिग बॉस मराठी’बद्दल भाष्य केलं. ती नेमकं काय म्हणाली? जाणून घ्या…
-
‘लोकमत फिल्मी’शी संवाद साधताना सईला विचारलं की, बिग बॉस बघते का? तेव्हा सई म्हणाली, “मी बिग बॉस फॉलो करत नाही.”
-
पुढे सई म्हणाली, “वर्षाताई आणि निक्की तांबोळी हा विषयी रील्सच्या माध्यमातून थोडाफार कळाला. वर्षाताई किती चिडल्या तरीही त्यांची भाषा आणि त्यांचा संयम सुटत नाही, हे मला खूप आवडलं आणि मला हे खूप गोड वाटलं.”
-
“वर्षाताईंची ही बाजू आम्हाला माहिती असण्याचं काहीच कारण नाही. वर्षाताईंबरोबर मला एकदाच काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यानंतर काहीच नाही. त्यामुळे त्यांची ही बाजू बघायला मजा आली,” असं सई ताम्हणकर म्हणाली.
-
सई ताम्हणकर सध्या ‘मानवत मर्डर’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.
-
‘सोनी लिव्ह’वर ही सीरिज प्रदर्शित होणार असून सत्य घटनेवर आधारित आहे.
-
‘मानवत मर्डर’ सीरिजमध्ये सई व्यतिरिक्त आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी, किशोर कदम आहे.
-
आशिष बेंडेने दिग्दर्शित केलेली ‘मानवत मर्डर’ सीरिज ४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. मराठीसह हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, बेंगाली या भाषांमध्ये पाहायला मिळणार आहे. (सर्व फोटो सौजन्य – कलर्स मराठी आणि सई ताम्हणकर)

‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral