-
ऑक्टोबर २०२४ हा महिना OTT प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाने भरलेला असणार आहे. या महिन्यात अनेक नवीन चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होणार आहेत, जे ओटीटी प्रेमींचे भरपूर मनोरंजन करणार आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या प्रमुख चित्रपट आणि वेब सिरीजबद्दल जाणून घेऊया. (Still From Film)
-
CTRL
अनन्या पांडेचा हिंदी भाषेतील थ्रिलर चित्रपट ‘CTRL’ ४ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. (Still From Film) -
Amar Prem Ki Prem Kahani
हिंदी भाषेतील रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘अमर प्रेम की प्रेम कहानी’ ४ ऑक्टोबरपासून जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. (Still From Film) -
It’s What’s Inside
अमेरिकन कॉमेडी हॉरर फिल्म ‘इट्स व्हाईट इनसाइड’ ४ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होईल. (Still From Film) -
Manvat Murders
‘मानवत मर्डर्स’ ही गुन्हेगारी विश्व उलगडणारी सिरिज ४ ऑक्टोबरपासून सोनी लिव्ह या ओटीटीवर प्रसारित होणार आहे. ही मालिका एका सत्य घटनेवर आधारित आहे. (Still From Film) -
The Signature
अनुपम खेर यांचा हिंदी भाषेतील ड्रामा असलेला चित्रपट ‘द सिग्नेचर’ ४ ऑक्टोबरपासून Zee5 वर प्रसारित होणार आहे. (Still From Film) -
The Tribe
अनन्या पांडेची बहीण अलाना पांडेची वेब सीरिज ‘द ट्राइब’ ४ ऑक्टोबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. (Still From Film) -
Salem’s Lot
“सालेम्स लॉट” हा चित्रपट ३ ऑक्टोबर रोजी HBO Max वर स्ट्रीम होईल. (Still From Film)
Waqf Amendment Bill: वक्फ दुरूस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेत मंजूर, पंतप्रधानांची मतदानाला दांडी