-
गोविंदा
बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागली आहे. हा अपघात झाला तेव्हा अभिनेता आपले परवाना असलेले रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवत होता. (फोटो: गोविंदा/इन्स्टाइन्स्टाग्राम) -
सध्या तो मुंबईतील कृती केअर हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे. (Still From Movie)
-
सलमान खान
सलमान खानला २०२४ मध्ये बंदुकीचा परवाना मिळाला होता. त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते त्यानंतर अभिनेत्याने स्वत:च्या संरक्षणासाठी बंदूक परवान्यासाठी अर्ज केला होता. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
अमिताभ बच्चन
बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडेही परवाना असलेली बंदूक आहे. बच्चन यांनी त्यांच्या एका ब्लॉगमध्ये सांगितले होते की, त्यांच्याकडे ३२ बोअरचे रिव्हॉल्व्हर आहे. (फोटो: अमिताभ बच्चन/इन्स्टाग्राम) -
सनी देओल
या यादीत अभिनेता आणि नेता सनी देओलच्या नावाचाही समावेश आहे. त्याच्याकडे रिव्हॉल्व्हर असल्याचे अभिनेत्याने निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. तर सनी देओलने सिंग साब द ग्रेट चित्रपटात चित्रीकरणासाठी त्याच्या वैयक्तिक पिस्तूलचा वापर केला होता. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
पूनम धिल्लन
बॉलीवूड अभिनेत्री पूनम ढिल्लनक यांच्याकडेही स्वतःची परवाना असलेली बंदूक आहे. अभिनेत्रीने त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की त्या परवाना असलेली बंदूक सोबत ठेवत नाहीत. घरी ठेवतात. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
रवि किशन
भोजपुरी चित्रपटांतील सुपरस्टार अभिनेत्यांपैकी एक असलेल्या रवी किशनकडे दोन परवानाधारक बंदुका आहेत. अभिनेत्याकडे रायफल आणि रिव्हॉल्व्हर आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
महेंद्रसिंग धोनी
क्रीडा जगताबद्दल बोलायचे झाले तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला २०१० मध्ये ९mm पिस्तूल खरेदी करण्याचा परवाना मिळाला होता. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
Marathi Language Controversy : “मराठी गया तेल लगाने, तुम…”; मुंबईत एल अँड टीच्या सुरक्षा रक्षकाची मुजोरी, मनसेने ‘असा’ शिकवला धडा