-
अभिनेता विकी कौशलने अलीकडेच अबुधाबीमध्ये शाहरुख खानसोबत आयोजित ‘आयफा 2024’चे सूत्रसंचालन केले आहे.
-
दोन्ही कलाकारांनी ‘झूम जो पठाण’ आणि ‘तौबा तौबा’ सारख्या गाण्यांवर सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली.
-
अभिनेता विकी कौशलने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शाहरुख खानसोबतचे अनेक फोटो शेअर केले.
-
अभिनेत्याने शाहरुख खानसोबत होस्टिंग करतानाचे अनुभव शेअर करत एक भावनिक खास पोस्ट लिहिली.
-
अभिनेत्याने लिहिले, “शाहरुखला स्टेजवर परफॉर्म करून, कार्यक्रम होस्ट करून जादू तयार करताना अनेकदा पाहिलेले पण, आयफामध्ये प्रत्यक्ष त्याच्याबरोबर स्टेज शेअर करणे आणि त्या जादूचा एक भाग होणे हे माझे स्वप्न होते.”
-
“धन्यवाद शाहरुख सर… तुमच्यासारखा कोणी नाही आणि कधी नसेलही.”, अशा शब्दांत शाहरुखबद्दल विकिने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
-
अभिनेता विकी कौशलच्या अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर तो त्याच्या आगामी ‘छावा’ या चित्रपटात रश्मिका मंदान्नासोबत दिसणार आहे.
-
या चित्रपटात तो छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
-
रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’मध्येही हा अभिनेता दिसणार आहे. (Photos Source: Vicky Kashal/ Instagram)
हेही वाचा- गोविंदाचे ‘हे’ सर्वोत्कृष्ट १० चित्रपट तुम्ही पाहिलेत का?, या OTT प्लॅटफॉर्म्सवर उपलब…

ट्रेनमध्येच कपल झालं बेभान; अश्लील चाळे करत अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल