-
झी मराठी वाहिनीने (Zee Marathi) नुकतेच ‘झी मराठी अवॉर्ड २०२४’ नामांकन पार्टीचे आयोजन केले होते.
-
‘Glittering Orange’ अशी यावेळीची नामांकन पार्टी (Zee Marathi Awards 2024 Nomination Party) थीम (Theme) होती.
-
सर्व कलाकारांनी पार्टीच्या थीमचे अनुसरण केले आणि त्यांच्या उत्कृष्ट केशरी पोशाखात (Orange Outfits) तयार होऊन ते हजर झाले होते.
-
यंदाचे झी मराठीचे (Zee Marathi Awards 2024) पंचविसावं महोत्सवी वर्ष आहे.
-
या निमित्ताने झी मराठीचं संपूर्ण कुटुंब एकत्र एका छताखाली आले, आजपर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि एकमेकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी.
-
जे कलाकार झी कुटुंबात १९९९ पासून सामील आहेत त्यांनी ही आपल्या लाडक्या वाहिनीच्या या पंचविसाव्या वर्षाच्या महोत्सवात हजेरी लावली.
-
जसजशी एका एका मालिकेची नामांकनं जाहीर होत होती, तसतशी कलाकारांची उत्कंठा अधिकच वाढत होती.
-
प्रत्येकजण फक्त आपल्या मालिकेच्या कलाकारांनाच नाही तर दुसऱ्या कलाकारांच्या मालिकेलाही तेवढच समर्थन करताना दिसले.
-
नामांकन जाहीर झाल्यावर स्टेजवर आणखीन एक कार्यक्रम रंगला.
-
सध्या चर्चेत असलेला क्रेटेक्स, जगप्रसिद्ध डीजे आणि संगीत निर्माता तो ही ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२४’ नामांकन पार्टी मध्ये सहभागी झाला आणि आपल्या सुप्रसिद्ध गाणं ‘तांबडी चामडी’ (Taambdi Chaamdi) वर सगळ्या कलाकारांना थिरकवले.
-
कलाकारांनी केशरी रंगाच्या पोशाखात रेड कार्पेटवर (Red Carpet Look) चारचाँद लावले.
-
उत्तोरोत्तर रंगत गेलेल्या या धमाल नामांकन सोहळ्यानंतर आता उत्कंठा लागली आहे ती ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२४’च्या भव्य सोहळ्याची.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल