-
रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ या चित्रपटात अभिनेत्री जिया शंकर महत्वाच्या भूमिकेत दिसली होती. (फोटो सौजन्य: जिया शंकर इन्स्टाग्राम)
-
‘वेड’ चित्रपटात दमदार अभिनय करत तिने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. (फोटो सौजन्य: जिया शंकर इन्स्टाग्राम)
-
आता एका मुलाखतीत तिने रितेश आणि जिनिलियाबद्दल वक्तव्य केले आहे. (फोटो सौजन्य: जिया शंकर इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री जिया शंकरने नुकतीच ‘पिंकविला’च्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत ‘वेड’ चित्रपटानंतर तू रितेश देशमुख किंवा जिनिलियाच्या संपर्कात आहेस का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. (फोटो सौजन्य: रितेश देशमुख इन्स्टाग्राम)
-
या प्रश्नाचे उत्तर देताना तिने म्हटले, “ते दोघेही खूप चांगले आहेत. नुकतेच माझ्या आईला दवाखान्यात दाखल केले होते.” (फोटो सौजन्य: रितेश देशमुख इन्स्टाग्राम)
-
“मला वाटते जर उपचारांचा काही फायदा नाही झाला तरी प्रार्थना उपयोगी येतील. त्यामुळे मी फक्त एक ट्विट केले होते.” (फोटो सौजन्य: जिनिलिया देशमुख इन्स्टाग्रा
-
“जेव्हा जिनिलियापर्यंत हे ट्विट पोहचले तेव्हा तिने मला फोन केला. त्यावेळी मी रितेश सरांबरोबरदेखील बोलले.” (फोटो सौजन्य: जिनिलिया देशमुख इन्स्टाग्राम)
-
“कोणत्याही गोष्टीची गरज असेल तर आम्हाला कळव”, असे त्यांनी मला सांगितले. जिनिलिया आणि रितेश दोघेही माणूस म्हणून खूप चांगले आहेत. (फोटो सौजन्य: जिया शंकर इन्स्टाग्राम)
-
“जर तुम्हाला त्यांना जाणून घ्यायची संधी मिळाली तर तुम्ही भाग्यवान आहात”, असे म्हणत जियाने या जोडीचे कौतुक केले आहे. (फोटो सौजन्य: जिया शंकर इन्स्टाग्राम)
-
जिया शंकरच्या कामाबद्दल बोलायचे तर तिने हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. (फोटो सौजन्य: जिया शंकर इन्स्टाग्राम)
-
याशिवाय ती बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. (फोटो सौजन्य: जिया शंकर इन्स्टाग्राम)
-
रितेश देशमुखने ‘वेड’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता, तर जिनिलियाने या सिनेमाची निर्मिती केली होती. यामध्ये रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, अशोक सराफ यांच्याबरोबर जिया शंकर ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसली होती. (फोटो सौजन्य: जिया शंकर इन्स्टाग्राम)

१ एप्रिल राशिभविष्य: अंगारकी विनायक चतुर्थीला बाप्पा कोणत्या राशीच्या पाठीशी उभा राहणार? कोणाला फायदा तर कोणाची इच्छापूर्ती होणार