-
पंढरीनाथ कांबळेने बिग बॉस मराठी ५ च्या घरातून बाहेर पडल्यानंतर घरातील सदस्यांबाबत केलेली वक्तवे सध्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य: पंढरीनाथ कांबळे इन्स्टाग्राम)
-
बिग बॉस मराठी ५ मधून बाहेर पडल्यावर पंढरीनाथ कांबळेने ‘कलाकट्टा’ला मुलाखत दिली. यावेळी तुम्ही बाहेर येताना सूरज फार भावुक झालेला दिसला नाही, यावर तुम्ही काय सांगाल?असा प्रश्न विचारण्यात आला. (फोटो सौजन्य: पंढरीनाथ कांबळे इन्स्टाग्राम)
-
त्यावर उत्तर देताना त्यांनी म्हटले, “अरबाज बिग बॉसच्या घरातून बाहेर जाताना निक्कीने ज्याप्रकारे आकांडतांडव केला होता. तसं तो कधी करणार नाही.” (फोटो सौजन्य: निक्की तांबोळी इन्स्टाग्राम)
-
“एक तर तो दिखावा करणारा मुलगा नाही. त्याला जे वाटतं, ते तो मनापासून करतो.”(फोटो सौजन्य: सूरज चव्हाण इन्स्टाग्राम)
-
“त्याला मनातून नक्की वाईट वाटलं असणार.”(फोटो सौजन्य: सूरज चव्हाण इन्स्टाग्राम)
-
“येताना फक्त येऊन मिठी मारली त्याने. त्या मिठीमध्ये मला सगळं लक्षात आलं.” (फोटो सौजन्य: सूरज चव्हाण इन्स्टाग्राम)
-
मी त्याला म्हटलं, “वेडा आहेस का?आठवडाभरानं पुन्हा भेटायचंच आहे.” (फोटो सौजन्य: पंढरीनाथ कांबळे इन्स्टाग्राम)
-
त्याला तो शोऑफ करायची गरज नाही, माझ्यासाठी तरी. त्यानं कॅमेऱ्यासाठी आणि बाकीच्या सदस्यांसाठी त्यानं तो केला असता. (फोटो सौजन्य: पंढरीनाथ कांबळे इन्स्टाग्राम)
-
“पण तो माझ्याशी जोडला होता, तर त्याला मला काही गोष्टी सांगायच्या होत्या.” (फोटो सौजन्य: पंढरीनाथ कांबळे इन्स्टाग्राम)
-
“मला माहितेय त्याच्या गोष्टी कशा कळतात आणि त्यालाही माहितेय. त्यानं जी मिठी मारली होती, ती घट्ट मिठी होती. ती बाकी कोणाला जाणवणार नाही.” (फोटो सौजन्य: पंढरीनाथ कांबळे इन्स्टाग्राम)
-
माझी अशी इच्छा आहे आणि मी प्रार्थना करतोय की ट्रॉफी त्यानं जिंकावी आणि त्याला जास्त गरज आहे त्या ट्रॉफीची; जेणेकरून त्याचं पुढचं आयुष्य सुखकर होईल.” (फोटो सौजन्य: पंढरीनाथ कांबळे इन्स्टाग्राम)
-
‘बिग बॉस मराठी ५’च्या घरातील सूरज चव्हाण आणि पंढरीनाथ कांबळे यांच्यातील बॉन्डिंग प्रेक्षकांना आवडले असल्याचे पाहायला मिळाले. (फोटो सौजन्य: पंढरीनाथ कांबळे इन्स्टाग्राम)

Waqf Amendment Bill: वक्फ दुरूस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेत मंजूर, पंतप्रधानांची मतदानाला दांडी