-
या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक मनोरंजक चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित झाल्या आहेत. जाणून घेऊया या चित्रपट आणि वेब सिरीजबद्दल.
-
तामिळ ॲक्शन-थ्रिलर चित्रपट ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ हा ३ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील थलपथी विजयची जबरदस्त ॲक्शन सीन्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.
-
‘सलेम्स लॉट’ नावाचा हॉरर चित्रपट हा ३ ऑक्टोबर रोजी एचबीओ मॅक्सवर प्रदर्शित झाला आहे.
-
अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण अलाना पांडेची नवीन वेब सीरिज ‘द ट्राइब’ देखील ४ ऑक्टोबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाली आहे.
-
अनुपम खेर यांची ‘द सिग्नेचर’ हा चित्रपट झी ५ वर ४ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला आहे.
-
जर तुम्ही मराठी भाषेतील थ्रिल चित्रपटाचे चाहते असाल तर ‘मनवत मर्डर्स’ हा एक उत्तम पर्याय आहे. ही क्राईम थ्रिलर मालिका ४ ऑक्टोबर रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित होत असून ती एका सत्य घटनेवर आधारित आहे.
-
अमेरिकन कॉमेडी हॉरर फिल्म ‘इट्स व्हॉट्स इनसाइड’ देखील ४ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना हास्य आणि भीतीचा अनोखा मिलाफ देतो. -
जर तुम्हाला रोमँटिक कॉमेडीची आवड असेल तर ‘अमर प्रेम की प्रेम कहानी’ नक्की पहा. हा हिंदी चित्रपट ४ ऑक्टोबर रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.
-
अनन्या पांडेचा थ्रिलर चित्रपट ‘कंट्रोल’ (CTRL)४ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील अनन्याच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…