-
सूरज चव्हाण ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला आहे.
-
त्याला गेले दोन महिने महाराष्ट्राच्या घराघरांतून भरभरून प्रेम मिळालं.
-
अखेर भरघोस मतं मिळवून सूरजने पाचव्या पर्वाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.
-
‘बिग बॉस’च्या घरात पहिल्याच आठवड्यात सूरजने वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं होतं.
-
अनेक अडचणींवर मात करून सूरजने सोशल मीडियावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.
-
पहिल्याच आठवड्यात सूरजने सध्या त्याची एका दिवसाची कमाई किती आहे हे सांगितलं होतं.
-
टिकटॉक अॅप सुरू असताना सूरजला दिवसाला ८० हजार मिळायचे पण, त्याकाळात त्याची अनेकांनी फसवणूक केली होती.
-
तर, “आता मला दिवसाला ३० ते ५० हजार मिळतात” असं सूरज चव्हाणने बिग बॉसच्या घरात सांगितलं होतं. तसेच “बच्चा बच्चा जानता है ‘गुलीगत धोका’ बोलणारा सूरज कोण आहे.” असंही सूरज म्हणाला होता.
-
दरम्यान, ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकल्यावर सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून सूरजवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी इन्स्टाग्राम व सूरज चव्हाण )
‘एमपीएससी’ची राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात मोठा निर्णय… एमपीएससीच्या बैठकीत ठरले की….