-
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले रविवारी (६ ऑक्टोबर) मोठ्या जल्लोषात पार पडला.
-
अभिजीत सावंत व सूरज चव्हाण टॉप २ सदस्य होते.
-
त्यापैकी सूरज चव्हाणने यंदाच्या पर्वाची ट्रॉफी जिंकली.
-
तर गायक अभिजीत सावंत उपविजेता ठरला.
-
सूरज चव्हाणला शो जिंकल्यावर १४.६ लाख रुपये आणि इतर बक्षिसं मिळाली.
-
सूरजने हा शो जिंकल्यावर त्याचं अभिनंदन केलं जात आहे.
-
पण सूरजचा बिग बॉसपर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. त्याने आयुष्यात खूप संघर्ष केला आहे.
-
पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ असलेल्या सूरजचा हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही.
-
Suraj Chavan Age: ३० वर्षांचा सूरज चव्हाण फक्त आठवी पर्यंत शिकला आहे.
-
सूरज लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले.
-
सूरज उदरनिर्वाहासाठी मजुरी करायचा, त्याला ३०० रुपये मिळायचे. नंतर तो टिकटॉवर व्हिडीओ करून प्रसिद्ध झाला.
-
टिकटॉक बंद झाल्यावर तो इन्स्टाग्राम रील्स बनवून लोकप्रिय झाला.

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन