-
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्यच्या घरी एका छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. तिने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या बेबी शॉवरचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. (Photo Source: @sarya12/instagram)
-
कुंडली भाग्य या लोकप्रिय मालिकेत ‘डॉ. ‘प्रीता’च्या भूमिकेत दिसणारी श्रद्धा लग्नाच्या तब्बल तीन वर्षांनी आई होणार आहे. (Photo Source: @sarya12/instagram)
-
दरम्यान, श्रद्धा आर्यने १६ नोव्हेंबर २०२१ रोजी दिल्लीचे नौदल अधिकारी राहुल नागल यांच्याबरोबर लग्न केले. आता दोघेही पालक होणार आहेत. (Photo Source: @sarya12/instagram)
-
श्रद्धाने तिच्या बेबी शॉवरचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा आनंद आणि प्रेग्नंसीची चमक तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. (Photo Source: @sarya12/instagram)
-
या बेबी शॉवर फोटोंमध्ये, अभिनेत्री तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे, जे पाहून चाहते तिला खूप शुभेच्छा देत आहेत. (Photo Source: @sarya12/instagram)
-
या फोटोंमध्ये श्रद्धा आर्यने गुलाबी रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे. या फंक्शनसाठी तिने गोल्डन मोटीफ वर्क असलेली साडी निवडली आहे. (Photo Source: @sarya12/instagram)
-
भारी जरी वर्क असलेल्या ब्लाउजसोबत तिने ही साडी पेअर केली आहे. ‘जरीएरा’ या कपड्यांच्या ऑनलाइन शॉपवर या साडीची किंमत ४८ हजार रुपये सांगण्यात आली आहे. (Photo Source: @sarya12/instagram)
-
साडीसोबतच या अभिनेत्रीने चकचकीत मेकअप, मोकळे केस आणि जड दागिन्यांनी तिचे सौंदर्य वाढवले आहे. (Photo Source: @sarya12/instagram)
-
दुसरीकडे, तिचा नवरा राहुल यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता, जो त्याने नेहरू जॅकेटसोबत पेअर केला होता. (Photo Source: @sarya12/instagram)
-
बेबी शॉवरपूर्वी, श्रद्धाने तिच्या पतीसोबत केक कापला आणि तिच्या मित्रांसोबत डान्सही केला. अभिनेत्रीने तिच्या जवळच्या मित्र आणि कुटुंबियांमध्ये तिचा बेबी शॉवर साजरा केला. (Photo Source: @sarya12/instagram)
हेही वाचा- Singham Again साठी अजय देवगणने घेतले ३५ कोटी, अर्जुन कपूर, टायगर, दीपिका, करीनाला कित…

रत्नागिरीला सुके मासे खाल्ले अन् माझं ब्लड प्रेशर…; अशोक सराफांनी ‘फिटनेस’वर केलं भाष्य; म्हणाले, “त्या दिवसापासून…”