-
अदिती राव हैदरी ही भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, जी केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या अनोख्या फॅशन सेन्ससाठी देखील प्रसिद्ध आहे. (Photo Source: @aditiraohydari/instagram)
-
अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, त्यातील तिचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Photo Source: @aditiraohydari/instagram)
-
या फोटोंमध्ये अदितीने काळ्या रंगाचा सुंदर गाऊन घातला आहे. या गाऊनच्या डिझायनिंगमध्ये साधेपणा आणि लालित्य यांचा अप्रतिम संगम दिसून येतो. (Photo Source: @aditiraohydari/instagram)
-
काळ्या रंगाचा हा गाऊन आदितीच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी आकर्षक बनवत आहे. (Photo Source: @aditiraohydari/instagram)
-
या ड्रेससोबत तिने तिच्या गळ्यात पांढऱ्या मोत्यांचा चोकर नेकलेस घातला आहे, ज्यामुळे तिचा लूक आणखीनच खास बनला आहे. (Photo Source: @aditiraohydari/instagram)
-
यासोबतच अदितीने कानात घातलेले छोटे झुमके तिचे सौंदर्य आणखी वाढवत आहेत. (Photo Source: @aditiraohydari/instagram)
-
तिने तिच्या दोन्ही हातात तिच्या ड्रेसला मॅचिंग अशा अंगठ्या घातल्या आहेत. (Photo Source: @aditiraohydari/instagram)
-
हेअरस्टाइलबद्दल बोलायचे झाले तर आदितीने तिचे केस बबल पोनीटेल स्टाईलमध्ये बांधले आहेत, ज्यामध्ये तिने केसांना अनेक छोट्या छोट्या भागांमध्ये बांधून बबल लूक दिला आहे. ही एक ट्रेंडींग केशरचना आहे. (Photo Source: @aditiraohydari/instagram)
-
अदिती राव हैदरीचा हा नवा लूक फॅशनप्रेमींना खूप आवडला आहे. त्याच वेळी, तिचे चाहते पोस्टच्या खाली कमेंटमध्ये तिचे कौतुक करताना दिसत आहेत. (Photo Source: @aditiraohydari/instagram)

Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश