-
राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी स्टारर चित्रपट ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ (VVKWWV) ११ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. हा १९९० च्या दशकातील रेट्रो थीमवर आधारित कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसत आहेत. (Still From Film)
-
चित्रपटात विजय राज, मल्लिका शेरावत आणि मुकेश तिवारी देखील मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले असून त्याचे बजेट जवळपास ३० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. (Still From Film)
-
अशा परिस्थितीत, या चित्रपटातील भूमिकांसाठी कलाकारांनी किती फी घेतली आहे ते जाणून घेऊया. (Still From Film)
-
राजकुमार राव
या चित्रपटात राजकुमार राव ‘विकी’ची भूमिका साकारत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने या चित्रपटासाठी ६ कोटी रुपये फी घेतली आहे. (Still From Film) -
तृप्ती दिमरी
‘ॲनिमल’ सारख्या चित्रपटातून चर्चेत आलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी या चित्रपटात ‘विद्या’च्या भूमिकेत आहे. तृप्तीची फी १ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. (Still From Film) -
मल्लिका शेरावत
मल्लिका शेरावतने बऱ्याच कालावधीनंतर चित्रपटात पुनरागमन केले आहे. मल्लिका या चित्रपटात विकीच्या कुटुंबातील सदस्याची भूमिका साकारत आहे. रिपोर्ट्सनुसार, मल्लिकाला या चित्रपटासाठी ५० लाख रुपये देण्यात आले आहेत. (Still From Film) -
विजय राज
या चित्रपटात विजय राज यांनी पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तो विकी आणि विद्याच्या हरवलेल्या टेपचा शोध घेताना दिसत आहे. त्याची फी ७० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. (Still From Film) -
अर्चना पूरण सिंग
या चित्रपटात अर्चना पूरण सिंह देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटासाठी अर्चनाला ४० लाख रुपये मिळाले आहेत. (Still From Film) -
मुकेश तिवारी
या चित्रपटासाठी मुकेश तिवारीला ४० लाख रुपये मानधन देण्यात आले आहे. (Still From Film)
हेही वाचा – Photos : काळ्या व पांढऱ्या रंगाच्या हटके ड्रेसमध्ये प्रिया बापटचा हॉट लूक, फोटो व्हाय…

बोल्ड कंटेंटमुळे थिएटरमध्ये प्रदर्शित न होऊ शकलेले ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी