-
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) ‘फुलवंती’ (Phullwanti) हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
-
पद्माविभूषण बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या ‘फुलवंती’ या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे.
-
या चित्रपटात प्राजक्ताने ‘फुलवंती’ची प्रमुख लक्षवेधी भूमिका साकारली आहे.
-
स्नेहल प्रवीण तरडेने (Snehal Pravin Tarde) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
-
‘फुलवंती’ चित्रपटाच्या प्रीमियर (Movie Premiere) सोहळ्यासाठी प्राजक्ताने सुंदर लूक केला होता.
-
प्रीमियर सोहळ्यासाठी प्राजक्ताने केशरी रंगाची पैठणी साडी (Orange Paithani Saree) नेसली होती.
-
प्राजक्ताने नेसलेल्या पैठणी साडीत चांदीची जर वापरली आहे. आणि त्यावर सोन्याचे लेपन करण्यात आले आहे.
-
एका वृत्तावाहिनीशी बोलताना प्राजक्ता म्हणाली की, ही पैठणी साडी तीन लाख रुपयांची (Three Lakh Rupees’) आहे.
-
प्राजक्ताबरोबर या चित्रपटात मराठीतील (Marathi Actors) नामवंत कलाकारांची फौज आहे.
-
‘फुलवंती’ या चित्रपटाची ३ दिवसांची एकूण कमाई (Box Office Collection) १ कोटी १९ लाख एवढी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”