-
एमटीव्ही रोडीज, स्प्लिट्सविला, बिग बॉस, नच बलिये अशा लोकप्रिय टीव्ही शोमधून प्रसिद्द झालेला अभिनेता प्रिन्स नरुला आता बाबा होणार आहे.
-
प्रिन्सने ‘बिग बॉस ९’मध्ये अभिनेत्री युविका चौधरीबरोबर प्रेमात पडल्यावर काही वर्षांनी लग्न केले होते.
-
दरम्यान, प्रिन्स आणि युविकाचे मॅटर्निटी फोटोशूट सध्या चर्चेत आले आहे.
-
अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्रिन्सने पत्नी युविकाबरोबर बेबी बंप फ्लाँट केलेला दिसत आहे.
-
या हटके मॅटर्निटी फोटोशूटचं त्यांचे चाहते कौतूक करत आहेत.
-
प्रिन्स नरुलाने चाहत्यांबरोबर काही महिन्यांआधी ही गुड न्यूज शेअर केली होती.
-
युविका व प्रिन्स यांच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलायचं झाल्यास ते ‘बिग बॉस ९’मध्ये भेटले होते आणि तिथेच प्रेमात पडले.
-
प्रिन्स युविकापेक्षा सात वर्षांनी लहान आहे. आता हे दोघे आई-बाबा होणार आहेत.
-
युविका ४० वर्षांची असून प्रिन्स ३३ वर्षांचा आहे. लग्नानंतर सहा वर्षांनी हे दोघे आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत.
-
(सर्व फोटो साभार प्रिन्स नरुला इन्स्टाग्राम पेज)
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”