-
बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने तिचा साउथमधील एक किस्सा सांगितला आहे.
-
तिला चित्रपटातून एका धक्कादायक कारणामुळे रिजेक्ट करण्यात आल्याबद्दल तिने माहिती दिली आहे.
-
‘हाऊटरफ्लाय’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मल्लिका शेरावतने हा खुलासा केला आहे.
-
दक्षिण चित्रपटसृष्टीतील एका चित्रपट निर्मात्यासोबत तिच्या कामाबद्दलचा अनुभव तिने यावेळी शेअर केला आहे.
-
ती म्हणाली “एका चित्रपटातील गाण्याच्या शूटिंगवेळी चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मला माझा हॉटनेस दाखवण्यास सांगितलं. शूटिंग दरम्यान दिग्दर्शकाने मला तुम्ही खूप हॉट आहात असं बोलून शूटिंगच्या पुढील सिनमध्ये काय होईल तेहा सांगितलं.”
-
दरम्यान हॉटनेस दाखवण्यासाठी तो सिन योग्य नव्हता, असं मल्लिकाचं म्हणणं असल्याने तिचे दिग्दर्शकासोबत थोडेसे वाद झाले आणि तो सिन शूट करण्यास तिने विरोध केला.
-
मल्लिकाने पुढे सांगितलं “तुम्ही कल्पना करू शकता असे दृश्य दाखवून त्यांना एक महिला किती हॉट आहे? हे दाखवायचं होतं. हॉटनेस दाखवण्यासाठी तो सिन योग्य नसताना दिग्दर्शकाने सांगितलं की हा गाण्यामधील अत्यंत महत्त्वाचा सिन आहे.”
-
त्यानंतर अभिनेत्रीला पुढे सांगितले गेले की तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे. त्या पात्रासाठी योग्य नसल्याचं कारण मल्लिकाला सांगण्यात आलं होतं.
-
मल्लिकाचा हा खळबळजनक खुलासा ऐकून सर्वांना धक्का बसला आहे. दरम्यान, अभिनेत्री मल्लिका शेरावत अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यावरून गायब होती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ या चित्रपटात ती एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे. (Photos Source – Mallika Sherawat/Instagram)
हेही पाहा- Photos : ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याने फ्लाँट केला बेबी बंप, प्रिन्स नरुला व पत्नी युविका चौधरीचं खास मॅटर्निटी फोटोशूट व्हायरल

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”