-
यंदा सूरज चव्हाणने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनच्या विजेतेपदावर नाव कोरलं.
-
सूरजच्या विजयानंतर सर्व स्तरांतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.
-
लहानशा मोढवे गावातून आलेल्या सूरजचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे शोमध्ये प्रत्येक सदस्याने त्याला खंबीर साथ दिली.
-
एवढंच नव्हे तर रितेश देशमुखने देखील त्याच्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
-
Bigg Boss ची ट्रॉफी जिंकल्यावर सूरजने माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्याने रितेशने दिलेल्या गिप्टबद्दल खुलासा केला.
-
आजवर सूरजची अनेकांनी फसवणूक केल्यामुळे रितेश आता, सूरजची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी त्याला पर्सनल मॅनेजर देणार आहे.
-
“रितेश सर म्हणाले, तुला एक मॅनेजर देतो. तो आमचाच मॅनेजर असल्याने तुला चांगलं समजून घेईल.” असं सूरजने माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.
-
जिनिलीयाबद्दल सांगताना सूरज म्हणाला, “ट्रॉफी जिंकल्यावर सर आणि वहिनी मला भेटले. वहिनी म्हणाल्या, तुम्ही लय भारी बोलता…सर्वांना खूप भारी हसवता”
-
तसेच आवडता हिरो रितेश देशमुख आणि आवडती अभिनेत्री जिनिलीया असल्याचं देखील सूरजने सर्वांना सांगितलं. ( सर्व फोटो सौजन्य : सूरज चव्हाण व जिनिलीया देशमुख इन्स्टाग्राम )

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…