-
अभिनेत्री प्राजक्ता माळीला आजघडीला कोणत्याही ओळखीची आवश्यकता नाही.
-
तिच्या कामाच्या जोरावर तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
प्राजक्ताचा ११ ऑक्टोर रोजी फुलवंती हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटाची ती स्वतः देखील सहनिर्माती आहे.
-
दरम्यान, प्राजक्ता माळीचा आजवरचा प्रवास कसा राहिलाय? याबद्दल जाणून घेऊयात.
-
प्राजक्ताने वयाच्या ६ व्या वर्षी भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली.
-
वयाच्या १३ व्या वर्षी तिने स्टार प्लसवरील ‘क्या मस्ती क्या धूम’ या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता, ज्यामध्ये ती विजयी झाली.
-
२०११ मध्ये तिने स्टार प्रवाहवरील ‘सुवासिनी‘ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
-
यानंतर, तिने झी मराठीवरील ‘एका पेक्षा एक: अप्सरा आली‘ या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला.
-
२०१३ साली ‘जुळून येती रेशिमगाठी‘ या मालिकेमुळे ती प्रचंड लोकप्रिय झाली, या मालिकेत तिने मेघना कुडाळकर देसाईची भूमिका साकारली होती.
-
२०१७ साली प्रदर्शित झालेल्या ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या मालिकेमध्ये तिने नूपुर ही भूमिका निभावली.
-
तिचं चित्रपट करिअर २०१३ मध्ये ‘खो-खो’ या चित्रपटापासून सुरू झालं. अभिनेते भरत जाधव या चित्रपटाचे नायक होते.
-
त्यानंतर ‘संघर्ष’, ‘हंपी‘, ‘आणि काशिनाथ घाणेकर’, ‘पार्टी‘, ‘तीन अडकून सीताराम’, ‘वाय’, ‘लकडाउन’, अशा प्रसिद्ध लोकप्रिय चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. ‘रानबाजार’ या लक्षवेधी वेब सिरिजमध्येही प्राजक्ता दिसली आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राजक्ता करते.
-
प्राजक्ता कवयित्रीदेखील असून तिने तिचा स्वतःचा काव्यसंग्रह “प्राजक्त प्रभा” प्रकाशित केला आहे.
-
याशिवाय अलीकडेच तिने “प्राजक्तराज” हा दागिन्यांचा ब्रँडही सुरू केला आहे.
-
दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपटाने पहिल्या ३ दिवसात एक कोटींपेक्षा अधिकची कमाईही केली आहे.
-
चित्रपटाची गाणीही अतिशय लोकप्रिय झाली आहेत.
-
(सर्व फोटो प्राजक्ता माळी इनस्टाग्राम पेजवरून साभार)
हेही पाहा- मल्लिका शेरावतने सांगितला दक्षिण चित्रपटसृष्टीतील धक्कादायक अनुभव, म्हणाली “चित्रीकरण…

भागवत एकादशी, २६ मार्च पंचांग: मेष ते मीनपैकी कोणाला लाभेल आज विठ्ठलाची कृपा; तुमचे नशीब कसे बदलणार? वाचा राशिभविष्य