-
मालिका विश्वातील मानाचा ‘झी मराठी अवॉर्ड २०२४’चा (Zee Marathi Award 2024) नामांकन सोहळा (Nomination Ceremony) नुकताच पार पडला.
-
या नामांकन सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी (Marathi Actors) होती.
-
झी मराठी (Zee Marathi) यंदा आपले २५ वर्ष (25 Years) साजरा करत आहे.
-
त्यामुळे यंदाचा ‘झी मराठी अवॉर्ड २०२४’ खास असणार हे नक्की.
-
नामांकन सोहळ्यात जसजशी एका एका मालिकेची (TV Serial) नामांकनं जाहीर होत होती, तसतशी कलाकारांची उत्कंठा अधिकच वाढत होती.
-
प्रत्येकजण फक्त आपल्या मालिकेच्या कलाकारांनाच नाही तर दुसऱ्या कलाकारांच्या मालिकेलाही तेवढच समर्थन करताना दिसले.
-
नामांकनाबरोबरच स्टेजवर आणखीन एक कार्यक्रम रंगला तो म्हणजे सध्या चर्चेत असलेला क्रेटेक्स (Kratex), जगप्रसिद्ध डीजे आणि संगीत निर्माता तो ही नामांकन सोहळ्यात सहभागी झाला. आपल्या सुप्रसिद्ध गाणं ‘तांबडी चामडी’वर (Taambdi Chaamdi) सगळ्या कलाकारांना थिरकवले.
-
या सोहळ्यात अभिनेता अभिजीत खांडेकर (Abhijeet Khandkekar) खुमासदार सूत्रसंचालन करणार आहे.
-
हा सोहळा प्रेक्षकांना २० ऑक्टोबर (20 October) रोजी संध्याकाळी ५ वाजता झी मराठीवर पाहता येणार आहे.
-
यंदाचा ‘झी मराठी अवॉर्ड २०२४’ प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राइझेस (Surprise) घेऊन येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…