-
Netflix वर अनेक भयपट चित्रपट आहेत परंतु येथे नमूद केलेले हे ९ हॉरर चित्रपट मुलांना अजिबात दाखवू नयेत. या सिनेमांमध्ये अनेक भितीदायक दृश्ये आहेत. हे सर्व चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहेत. (फोटो: नेटफ्लिक्स)
-
९- The Craft: Legacy
जर तुम्हाला हॉरर चित्रपट पाहण्याची आवड असेल तर तुम्ही द क्राफ्ट: लेगसी एकदा नक्की पहा. परंतू लहान मुलांसोबत बघू नका कारण की चित्रपटातील अनेक भितिदायक दृश्ये मुलांना अनेक दिवस त्रासाचे ठरु शकतात. (फोटो: नेटफ्लिक्स) -
८- Fear Street Part 2 : 1978
या चित्रपटातही अनेक भितीदायक दृश्ये आहेत. अशा परिस्थितीत हाही चित्रपट लहान मुलांना दाखवला नाही तर बरे होईल. हा अमेरिकन चित्रपट २०२१ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. (फोटो: नेटफ्लिक्स) -
७- Carrie
या चित्रपटातील अनेक दृश्ये पाहिल्यानंतर भुताटकीचे चित्रपट पाहणाऱ्यांनाही भीती वाटू शकते. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला तयार करण्यासाठी ३० दशलक्ष डॉलर्स खर्च आला आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे ८४ दशलक्ष डॉलर्स कमावले. (फोटो: नेटफ्लिक्स) -
६- Eli
एली देखील सर्वोत्तम हॉरर चित्रपटांपैकी एक आहे. २०१९ साली प्रदर्शित झालेला हा अमेरिकन हॉररपट लहान मुलांसोबत पाहू नये. दरम्यान, असे बरेच लोकदेखील आहेत जे हा चित्रपट एकटे पाहू शकत नाहीत. (फोटो: नेटफ्लिक्स) -
-५ Texas Chainsaw Massacre
हा अमेरिकन हॉरर चित्रपट खूप भीतीदायक आहे. ८० हजार डॉलर्समध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०.०९ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली. हा चित्रपट पाहिल्यानंतर मुले खूप घाबरू शकतात, त्यांच्या तब्येतीची काळजी म्हणून हा चित्रपट त्यांच्यासमवेत अजिबात पाहू नका. (फोटो: नेटफ्लिक्स) -
४- The Babysitter: Killer Queen
२०२० मध्ये रिलीज झालेल्या द बेबीसिटर: किलर क्वीन या अमेरिकन चित्रपटातही अनेक भीतीदायक दृश्ये आहेत. हा चित्रपट चुकूनही मुलांना दाखवू नये. (फोटो: नेटफ्लिक्स) -
३- Halloween
या चित्रपटात अनेक भीतीदायक दृश्ये आहेत जी मुलांना घाबरवू शकतात. याशिवाय अशा चित्रपटांचा त्यांच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. (फोटो: नेटफ्लिक्स) -
२- Ouija: Origin of Evil
Ouija: Origin of Evil हा देखील शक्तिशाली भयपट चित्रपटांमध्ये गणला जातो. हा अमेरिकन हॉरर चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा देखील मुलांबरोबर पाहू नये. (फोटो: नेटफ्लिक्स) -
१- Annabelle Comes Home
ॲनाबेले कम्स होम हा एक अमेरिकन भयपट चित्रपट आहे जो २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात इतकी भितीदायक दृश्ये आहेत की ती पाहिल्यानंतर लहान मुलेच नाही तर मोठेही घाबरतात. हा चित्रपट आजवरच्या सर्वोत्तम हॉरर चित्रपटांमध्ये गणला जातो. (फोटो: नेटफ्लिक्स) हेही पाहा-Hema Malini turns 76: ‘ड्रीम गर्ल’ने धर्मेंद्रबरोबर लग्न करण्यासाठी ‘या’ दिग्गज कलाका…

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा