-
अनेकांना माहित नसेल की दक्षिण चित्रपटसृष्टीतील अनेक मोठे कलाकार बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेल्या मोठ्या बॉलीवूड चित्रपटांसाठी पहिली पसंत होते. पुष्पा फेम अल्लू अर्जुन, नयनतारा आणि KGF स्टार यश यांच्यासह इतरही काही अभिनेत्यांनी वेगवेगळ्या कारणांमुळे हिंदी चित्रपटातील या भूमिका नाकारल्या आहेत. चल याबद्दल जाणून घेऊयात.
-
बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीला सिंघममध्ये अजय देवगणबरोबर काव्याची भूमिका ऑफर करण्यात आली होती जी नंतर काजल अग्रवालने साकारली आहे.
-
शाहिद कपूर स्टारर जर्सीसाठी रश्मिका मंदान्नाला संपर्क करण्यात आला होता पण तिच्या कामाच्या व्यग्रतेमुळे ती या चित्रपटाला होकार देऊ शकली नाही.
-
सैफ अली खान स्टारर लाल कप्तान हा चित्रपट सुरुवातीला यशला ऑफर करण्यात आला होता. मात्र, KGF स्टारने त्यास नकार दिला होता.
-
चेन्नई एक्सप्रेसमध्ये कॅमिओसाठी नयनताराशी संपर्क साधण्यात आला होता पण ती मोठ्या भूमिकेसाठी उत्सुक होती.
-
त्यामुळे तिने रोहित शेट्टी दिग्दर्शित ब्लॉकबस्टर चित्रपटाला नकार दिला.
-
दिग्दर्शक संदीप वंगा रेड्डी यांचा सर्वात मोठा सुपरहिट चित्रपट ‘ॲनिमल’मध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे, परंतु हा सिनेमा पहिल्यांदा महेश बाबूला ऑफर करण्यात आला होता.
-
माध्यमांतील माहितीनुसार बजरंगी भाईजानची ऑफर प्रथम अल्लू अर्जुनला देण्यात आली होती, अल्लू अर्जुनने ती नाकारली आणि नंतर सलमान खानने मुख्य भूमिका साकारली.
-
(सर्व फोटो- लोकसत्ता संग्रहित)
हेही वाचा- नेटफ्लिक्सचे हे ‘९’ हॉरर चित्रपट लहान मुलांसह अजिबात पाहू नका, नेहमी भयपट पाहणाऱ्यांनाही भीती वाटू शकते
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा