-
अलीकडेच सुप्रसिद्ध नेता बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे. बाबा सिद्दीकी अभिनेता सलमान खानच्या खूप जवळचे होते. लॉरेन्स बिश्नोईचे म्हणणे आहे की, त्याचे सलमान खानशी वैर आहे, त्यामुळेच त्याने बाबा सिद्दिकी यांची हत्या केली. दरम्यान, एकेकाळी सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये असलेली बॉलिवूड अभिनेत्री सोमी अलीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून लॉरेन्स बिश्नोईला एक मेसेज पाठवला आहे आणि त्याचा नंबर मागितला आहे. (फोटो: सोमी अली/इन्स्टा)
-
लॉरेन्स बिश्नोईला संदेश
लॉरेन्स बिश्नोईचा फोटो शेअर करताना सोमी अलीने लिहिले की, “हा थेट लॉरेन्स बिश्नोईला संदेश आहे. नमस्कार लॉरेन्स भाई. तुरुंगातूनही तुम्ही झूम कॉल करत असल्याचे मी ऐकले आणि पाहिलेही आहे, त्यामुळे मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे. हे कसे होऊ शकते ते कृपया मला सांगा.” पुढे, अभिनेत्रीने लिहिले आहे की “संपूर्ण जगात आमचे आवडते ठिकाण राजस्थान आहे. आम्हाला तिथे मंदिरात पूजेसाठी यायचे आहे, पण आधी तुमच्याशी झूम कॉल करू आणि म गपूजेनंतर काही बोलू. माझ्यावर विश्वास ठेवा की हे फक्त तुमच्या फायद्यासाठी आहे. मला तुमचा मोबाईल नंबर द्या, माझ्यावर खूप उपकार होतील. धन्यवाद.” (फोटो: सोमी अली/इन्स्टा) -
बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना
आता आपल्याला माहित आहे की सोमी अलीने लॉरेन्स बिश्नोईला कोणता खास संदेश पाठवला आहे, परंतु सोमी अली वयाच्या ५ आणि ९ व्या वर्षी लैंगिक शोषणाची शिकार झाली होती हे फार कमी लोकांना माहित आहे. तिच्यावर बलात्कारही झाला आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
नोकरानेच केले लैंगिक शोषण
सोमी अलीचा जन्म २५ मार्च १९७६ रोजी कराची, सिंध, पाकिस्तान येथे झाला. तिची आई तेहमीना ही इराकी महिला असून वडील मदन हे पाकिस्तानचे आहेत. सोमी अलीने तिच्या एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता की, ती जेव्हा पाकिस्तानातील कराची येथे वास्तव्यास होती, तेव्हा वयाच्या ५ आणि ९ व्या वर्षी तिच्या घरातील नोकराने तिचे लैंगिक शोषण केले होते. (फोटो: सोमी अली/इन्स्टा) -
पाकिस्तानातून अमेरिकेत गेली
वयाच्या ९ व्या वर्षी सोमी अली तिच्या आई आणि भावासोबत अमेरिकेतील दक्षिण फ्लोरिडा येथे गेली. पण इथेही तिला आयुष्यातील सर्वात वाईट दिवस पाहावे लागले. (फोटो: सोमी अली/इन्स्टा) -
शाळेत झाला बलात्कार
खरं तर, फ्लोरिडामधील मियामीमध्ये ज्या शाळेत ती शिक्षण घेत होती, तिथे तिला एका १७ वर्षांच्या मुलाने धमकावले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी सोमी अली अल्पवयीन होती आणि तिचे वय अवघे १४ वर्षे होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
आईसोबत घरगुती हिंसाचार
केवळ सोमी अलीच नाही तर तिची आईही पाकिस्तानात घरगुती हिंसाचाराची शिकार झाली असून अभिनेत्री आणि तिचा भाऊही याचे साक्षीदार आहेत. यानंतर सोमी अलीने शाळा सोडली. (फोटो: सोमी अली/इन्स्टा) -
लहानपणापासूनच सलमान खानची चाहती होती
सोमी अली लहानपणापासूनच सलमानची फॅन होती. वयाच्या १६व्या वर्षी ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आली आणि मॉडेलिंगमधून अभिनयाच्या जगात प्रवेश केला. सोमी अलीबाबत असे म्हटले जाते की, तिचे सलमान खानसोबतचे नाते जवळपास आठ वर्षे होते. यानंतर, अभिनेत्री तिचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी १९९९ मध्ये परत फ्लोरिडाला परतली. (फोटो: सोमी अली/इन्स्टा) -
या बॉलिवूड चित्रपटांमध्ये केले काम
सोमी अलीने १९९३ मध्ये कृष्ण अवतार या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने अंता, यार गद्दार, तीसरा कौन?, आओ प्यार करें, आंदोलन, माफिया आणि चुप या चित्रपटांमध्ये काम केले. (फोटो: इंडियन एक्स्प्रेस)
हेही पाहा – लॉरेन्स बिश्नोई टोळी ‘डी कंपनी’च्या वाटेवर?; हाजी मस्तान, करीम लाला ते अरुण गवळी ‘या’ माफियांचे होते मुंबईवर राज्य!
Chhaava: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”