-
जर आपण २०२४ या वर्षाचा आत्तापर्यंतचा विचार केला तर या वर्षात फक्त काहीच मोठे चित्रपट पाहायला मिळाले ज्यांनी प्रेक्षकांना मोठ्या संख्येने चित्रपटगृहांकडे खेचले. (Photo- Social Media)
-
दरम्यान, या वर्षात अजूनही काही बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहेत जे प्रेक्षकांना फक्त एक अविस्मरणीय अनुभव देणार नाहीत तर त्याचबरोबर बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई कमाई करतील अशी अपेक्षा जाणकार व्यक्त करत आहेत. चला आगामी प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या काही चित्रपटांवर एक नजर टाकू जे या दिवाळीत धमाका करतील आणि वर्षाचा शेवटही दणक्यात करतील, अशी अपेक्षा आहे. (Photo- Social Media)
-
बेबी जॉन हा आगामी हिंदी ॲक्शन थ्रिलर सिनेमा आहे. हा चित्रपट साऊथमधील प्रसिद्ध दिग्दर्शक कालीस यांचा आहे आणि ॲटली, मुराद खेतानी आणि ज्योती देशपांडे हे तगडे निर्माते या चित्रपटाला लाभले आहेत. हा चित्रपट ॲटली कुमारच्या २०१६ मधील ‘थेरी’ या तमिळ चित्रपटपासून प्रेरित आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटात वरुण धवन मुख्य भूमिकेत असणार आहे, कीर्ती सुरेश, वामिका गब्बी आणि जॅकी श्रॉफ यांच्याही महत्वपूर्ण भूमिका सिनेमात पाहायला मिळणार आहेत. (Photo- Social Media)
-
कांगुवा हाही एक बहुप्रतीक्षित रिलीझ असणार आहे, दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता सूर्याच्या या चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट दक्षिण भारतीय चित्रपट क्षेत्रासह बोलीवूडमध्येही प्रचंड कमाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने चित्रपटप्रेमीमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. हा चित्रपट १४ नोव्हेंबर २०२४ रोजी रिलीज होणार आहे. (Photo- Social Media)
-
सिंघम अगेन या दिवाळीत रिलीज होणार आहे. प्रेक्षकांना रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सची ॲक्शन पडद्यावर पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील हा पाचवा भाग आहे आणि सिंघम रिटर्न्सचा सीक्वल आहे. ट्रेलरला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता लक्षात येते. (Photo- Social Media)
-
जबरदस्त ॲक्शन आणि दिग्गज कलाकारांनी भरलेला हा चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी दिवाळीला रिलीज झाल्यावर बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड प्रस्थापित करेल अशी अपेक्षा आहे. (Photo- Social Media)
-
भूल भुलैया ३ हा वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे, या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा होते आहे. प्रेक्षकांच्या आवडत्या भूल भुलैया फ्रँचायझीचा हा चित्रपट पुढील भाग आहे. हा चित्रपट या दिवाळीत १ नोव्हेंबर २०२४ रोजी रिलीज होणार आहे. भूल भुलैया ३ हा वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. (Photo- Social Media)
-
छावा हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक भव्यदिव्य चित्रपट आहे, यामध्ये संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशलने साकारली आहे. शिवाजी सावंत यांच्या छावा या मराठी कादंबरीवर आधारित हा चित्रपट असणार आहे. मारठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना, संतोष जुवेकर, नील भूपालम, प्रकाश राज, आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि प्रदीप रावत हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट ६ डिसेंबर २०२४ रोजी रिलीज होणार आहे. (Photo- Social Media)
-
पुष्पा: द राइजच्या अभूतपूर्व यशानंतर, त्याचा सिक्वेल पुष्पा २: द रुलच्या रिलीजची पेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या टीझरने खळबळ उडवून दिलेली आहे. ६ डिसेंबर २०२४ रोजी रिलीज होणाऱ्या या चित्रपटाकडून बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडतील अशी अपेक्षा जाणकार व्यक्त करत आहेत. (Photo- Social Media)

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर