-
भारतात २६ नोव्हेंबर २००८ ही अशी तारीख आहे की ती आठवून प्रत्येकाचे डोळे पाणावतात. या दिवशी देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर पाकिस्तानमधील प्रशिक्षित आणि आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या १० दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या दहशतवाद्यांनी मुंबईतील गर्दीची ठिकाणे आणि प्रतिष्ठित इमारतींना लक्ष्य केले होते. (फोटो: Zee5)
-
२६/११ च्या मुंबई हल्ल्यावर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट आणि वेब सिरिज बनल्या आहेत.
-
जगातील सर्वात मोठ्या आणि क्रूर दहशतवादी हल्ल्यांपैकी एक असलेल्या मुंबई हल्ल्यावर कोणते चित्रपट आणि वेबसिरिज बनल्या आहेत ते जाणून घेऊयात. (फोटो: Zee5)
-
(The Attacks of 26/11)
मुंबई हल्ल्याच्या पाच वर्षांनंतर, ‘द अटॅक्स ऑफ २६/११’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये नाना पाटेकर आणि अतुल कुलकर्णी यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या चित्रपटात संजीव जयस्वाल या अभिनेत्याने दहशतवादी कसाबची भूमिका साकारली होती. हा चित्रपट तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकता. (फोटो: जिओ सिनेमा) -
(State of Siege: 26/11)
स्टेज ऑफ सीज: २६\११ ही देखील मुंबई हल्ल्यावर आधारित वेब सीरिज आहे. या मालिकेत शोएब कबीरने अजमल कसाबची भूमिका साकारली आहे. ही वेब सिरीज २०२० मध्ये रिलीज झाली आणि OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर पाहता येईल. (फोटो: Zee5) -
(Taj Mahal)
२०१५ मध्ये ताजमहाल हा चित्रपट प्रदर्शित झाला होता जो फ्रेंच-बेल्जियन चित्रपट होता. या चित्रपटात २६/११ च्या हल्ल्यातील दहशतवाद्यांनी ताजमहाल पॅलेस हॉटेलवर केलेला हल्ला दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. (फोटो: प्राइम व्हिडिओ) -
(Mumbai Diaries 26/11)
मोहित रैना आणि कोंकणा सेन शर्मा स्टारर वेब सिरीज मुंबई डायरी प्राइम व्हिडिओवर पाहता येईल. ही मालिका देखील २६/११ च्या हल्ल्यावर आधारित आहे. (फोटो: प्राइम व्हिडिओ) -
(Major)
२०२२ साली प्रदर्शित झालेला ‘मेजर’ हा चित्रपट मुंबई हल्ल्यात शहीद झालेले भारतीय लष्कर अधिकारी संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर पाहता येईल. (फोटो: नेटफ्लिक्स) -
(Hotel Mumbai)
मुंबई अटॅकवर आधारित चित्रपट हॉटेल मुंबईमध्ये अनुपम खेर आणि देव पटेल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट Zee5 वर पाहता येईल. (फोटो: Zee5)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही