-
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत राहिली. (फोटो सौजन्य: जान्हवी किल्लेकर इन्स्टाग्राम)
-
तिच्या चांगल्या-वाईट वागण्यावर प्रेक्षकांसह कलाकारांनीदेखील सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले. (फोटो सौजन्य: जान्हवी किल्लेकर इन्स्टाग्राम)
-
वैभव चव्हाण आणि अरबाज पटेलबरोबर असलेल्या तिच्या मैत्रीचीदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. (फोटो सौजन्य: वैभव चव्हाण आणि अरबाज पटेल इन्स्टाग्राम)
-
वर्षा उसगांवकरांचा केलेला अपमान, पंढरीनाथ कांबळेबाबत केलेले वक्तव्य यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. (फोटो सौजन्य: पंढरीनाथ कांबळे इन्स्टाग्राम)
-
ग्रुपमधून बाहेर पडत एकटीने खेळण्याचा घेतलेला निर्णय, निक्कीबरोबरचे शत्रुत्व, वर्षा उसगांवकरांच्या मनात स्वत:साठी निर्माण केलेली जागा, टास्कमध्ये केलेली कामगिरी यामुळे जान्हवी किल्लेकर सतत चर्चेत राहिली. (फोटो सौजन्य: जान्हवी किल्लेकर इन्स्टाग्राम)
-
‘बिग बॉस मराठी ५’ मधून बाहेर पडल्यानंतर जान्हवीने मुलाखतींमधून विविध विषयांवर गप्पा मारल्या आहेत. तिने ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत संग्राम चौगुलेबरोबरच्या मैत्रीवर वक्तव्य केले आहे. (फोटो सौजन्य: जान्हवी किल्लेकर इन्स्टाग्राम)
-
जान्हवी किल्लेकरने म्हटले, “संग्राम चौगुले खूप हसवायचे मला. तो काळ असा होता की मी ए ग्रुपमध्ये नव्हते आणि बी ग्रुपमध्येसुद्धा नव्हते. मी एकटी होते. त्यांना ते कळत होतं.” (फोटो सौजन्य: संग्राम चौगुले इन्स्टाग्राम)
-
“शेवटच्या दिवशी, ज्यावेळी ते बिग बॉसच्या घराबाहेर जात होते, त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की, जान्हवी तू अजून माझी मैत्रीण नाहीयेस, मैत्री करायला अजून खूप वेळ आहे, तू इथे स्पर्धक आहेस. असं त्यांनी मला म्हटलं होतं.” (फोटो सौजन्य: संग्राम चौगुले इन्स्टाग्राम)
-
पुढे बोलताना जान्हवीने म्हटले, “ते नेहमी मला अन्नपूर्णा म्हणून हाक मारायचे. तू मला जेवण बनवून देतेस, त्यामुळे तू अन्नपूर्णा आहेस, असं ते मला म्हणायचे. ते एक छान बॉन्डिंग होतं.” (फोटो सौजन्य: संग्राम चौगुले इन्स्टाग्राम)
-
“मी त्यांना सांगितलेलं की तुम्ही हा शो सोडून जा. तुम्ही मला या घरात नकोय. कारण- इतक्या मोठ्या लेव्हलचा एक माणूस अशा पद्धतीने ट्रोल होतोय, अपमानित होतोय हे मला नको होतं.” (फोटो सौजन्य: जान्हवी किल्लेकर इन्स्टाग्राम)
-
“त्यांनी भारतासाठी बरेच मेडल आणलेत. अशा माणसाचा बिग बॉसच्या घरात अपमान होतोय, हे मला आवडत नव्हतं. म्हणून मी स्वत: त्यांना म्हणत होते की तुम्ही जा. नका थांबू. बस ही मैत्री होती”, असे म्हणत जान्हवीने संग्राम चौगुलेबरोबरच्या मैत्रीवर वक्तव्य केले आहे. (फोटो सौजन्य: जान्हवी किल्लेकर इन्स्टाग्राम)
-
जान्हवी किल्लेकर सहाव्या स्थानावरून ९ लाख घेत बिग बॉसच्या घराबाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. (फोटो सौजन्य: जान्हवी किल्लेकर इन्स्टाग्राम)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड