-
मुंबईत हक्काचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता आणि लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकरचं अलीकडेच हे स्वप्न साकार झालं आहे.
-
अक्षय केळकर करिअर घडवण्यासाठी मुंबईत आल्यावर सुरुवातीला आपल्या मित्रांसह ८ वर्षे भाड्याच्या घरात राहिला.
-
अक्षयने त्याचवेळी मुंबईत हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहिलं होतं.
-
गेल्यावर्षी म्हाडाच्या सोडतीत अर्ज भरून अक्षयला त्याचं हक्काचं घर मिळालं.
-
आपल्या पहिल्या घराचं इंटिरिअर करण्यासाठी या अभिनेत्याने खूपच मेहनत घेतली आहे.
-
संपूर्ण घराला अक्षयने मराठमोळा, पारंपरिक टच दिला आहे.
-
अभिनेत्याने घरातील एका कोपऱ्यात ‘बिग बॉस मराठी’ जिंकल्यावरची ट्रॉफी आणि काही वस्तू ठेवण्यासाठी विशेष जागा तयारी केली आहे.
-
अक्षय केळकरच्या घरात पाऊल ठेवल्यावर विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन, मराठमोळी सजावट, प्रशस्त हॉल या सगळ्या गोष्टी लक्ष वेधून घेतात.
-
तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने घराचं हे स्वप्न पूर्ण झाल्याचं अक्षय केळकर आवर्जून सांगतो. ( सर्व फोटो सौजन्य : अक्षय केळकर युट्यूब चॅनेल )

Amol Kolhe: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हे यांचे धक्कादायक विधान; शरद पवारांच्या सूचनेबाबत म्हणाले…