-
नंदामुरी तारका रामाराव ज्युनियर, ज्याला आपण ज्युनियर एनटीआर (Junior NTR) म्हणून ओळखतो, तो दक्षिण चित्रपट उद्योगातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचा अभिनय, नृत्य आणि सदृढ व्यक्तिमत्वामुळे त्याने दक्षिण चित्रपटसृष्टीत मोठे नाव कमवले आहे. (Photo Source: @jrntr/instagram)
-
तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात जास्त मानधन घेणारा ज्युनियर एनटीआरचा फॅन फॉलोइंग इतका मोठा आहे की लोक त्याच्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. (Photo Source: @jrntr/instagram)
-
याचे सर्वात मोठे उदाहरण २००४ साली पाहायला मिळाले. ज्युनियर एनटीआरचा ‘आंध्रवाला’ हा चित्रपट रिलीज होणार असताना ही घटना घडली. (Photo Source: @jrntr/instagram)
-
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी एका भव्य संगीत लाँच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्युनियर एनटीआरला पाहण्यासाठी या कार्यक्रमाला एवढा मोठा जनसमुदाय जमेल याची कुणालाही कल्पना नव्हती. (Photo Source: @jrntr/instagram)
-
खुद्द ज्युनियर एनटीआरने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये या घटनेचा उल्लेख केला होता. त्याने सांगितले की त्यावेळी जवळपास १० लाख चाहते त्याला पाहण्यासाठी कार्यक्रमाला पोहोचले होते. (Photo Source: @jrntr/instagram)
-
परिस्थिती हाताळण्यासाठी, राज्य सरकारला १० विशेष गाड्या चालवाव्या लागल्या जेणेकरून गर्दीवर नियंत्रण ठेवता येईल आणि लोकांना कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचवता येईल. (Photo Source: @jrntr/instagram)
-
विशेष म्हणजे एवढा मोठा जनसमुदाय असूनही या कार्यक्रमात कोणतीही हाणामारी झाली नाही किंवा मोठी दुर्घटनाही झाली नाही. खुद्द ज्युनियर एनटीआरसाठीही ही गोष्ट आश्चर्यकारक होती. (Photo Source: @jrntr/instagram)
-
तथापि, २०१५ मध्ये, ज्युनियर एनटीआरच्या एका चित्रपटाच्या कार्यक्रमादरम्यान एका चाहत्याचा मृत्यू झाला. तेव्हापासून ज्युनियर एनटीआरने त्या चाहत्याच्या कुटुंबाची जबाबदारी स्वत:वर घेतली. (Photo Source: @jrntr/instagram)
-
दरम्यान, ज्युनियर एनटीआरने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी त्याने आजोबांच्या ‘ब्रह्मर्षि विश्वामित्र’ या चित्रपटात काम केले. (Photo Source: @jrntr/instagram)
-
यानंतर राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या ‘रामायणम’ चित्रपटात त्याने भगवान रामाची भूमिका साकारली. २००१ मध्ये ‘निन्नू चूडलानी’ मधून त्याने मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले आणि त्याच वर्षी रिलीज झालेल्या ‘स्टुडंट नंबर १’ ने त्याला स्टार बनवले. (Photo Source: @jrntr/instagram)
-
यानंतर या अभिनेत्याने ‘आदी’, ‘सिम्हाद्री’, ‘बादशाह’, नन्नकू प्रेमाथो, ‘जय लावा कुश’ आणि अरविंदा समेथा वीरा राघवा सारखे चित्रपट केले. त्याच वेळी ‘आरआरआर’ चित्रपटाने त्याला पॅन इंडियाचा स्टार बनवले. या चित्रपटातील ‘नाचो नाचो’ गाण्यातील त्याचा आणि राम चरणचा दमदार डान्स खूप गाजला आणि या गाण्याला ऑस्कर पुरस्कारही मिळाला. (Photo Source: @jrntr/instagram)
हेही पाहा- अभिनेत्री नुसरत भरुचाच्या बोल्ड अंदाजाने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष, पाहा Photos…
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख