-
‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केल्यावर अंकिताने लवकरच लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं.
-
आता घराबाहेर आल्यावर ‘कोकण हार्टेड गर्ल’ने तिच्या होणार्या नवऱ्याचा चेहरा अखेर सर्वांसमोर उघड केला आहे.
-
“सूर जुळले…” असं कॅप्शन देत तिने होणारा नवरा प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक कुणाल भगत असल्याचं सर्वांना सांगितलं आहे.
-
या दोघांनी लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना दिली होती असं अंकिताने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
-
अंकिता यात म्हणते, “जेव्हा आमचं लग्न ठरत होतं तेव्हाची एक गोष्ट… आमच्या दोघांचे बरेच गुण जुळतात, त्यात आमचा एक गुण जुळला तो म्हणजे आमचे इमोशन्स. त्या इमोशन्समधली एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माननीय राज ठाकरे.”
-
अंकिताचा होणारा नवरा कुणाल भगतने राज ठाकरेंवर आधारित ‘येक नंबर’ चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.
-
“कुणाल या चित्रपटासाठी काम करतोय हे समजल्यावर मला खूप आनंद झाला होता. यादरम्यान, राज साहेबांना आम्ही सगळ्यात आधी आमच्या लग्नाची बातमी दिली होती.” असं अंकिताने सांगितलं आहे.
-
अंकिता व कुणाल यांनी त्यांच्या लग्नाची बातमी गुढीपाडव्यादिवशी राज ठाकरेंना दिली होती. मात्र, त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’ची ऑफर आल्याने त्यांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं.
-
आता अंकिता व कुणाल केव्हा लग्नगाठ बांधणार याची उत्सुकता ‘कोकण हार्टेड गर्ल’च्या तमाम चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे. ( सर्व फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख