-
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इतक्या वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट केले आहेत. त्यांनी अनेक दिग्गज अभिनेत्रींबरोबर काम केलं. (फोटो सौजन्य: अमिताभ बच्चन इन्स्टाग्राम)
-
कामाबद्दल असलेल्या त्यांच्या समर्पणाची अनेकदा चर्चा होताना दिसते. एका मुलाखतीत अभिनेत्री झीनत अमान यांनी एक किस्सा सांगितला होता. हा किस्सा ‘खइके पान बनारसवाला’ गाण्याच्या शूटिंगचा होता. (फोटो सौजन्य: अमिताभ बच्चन इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री झीनत अमान यांनी २०१७ ला फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत अमिताभ यांच्या कामाप्रति असलेल्या समर्पणाविषयी बोलताना एका चित्रपटाची आठवण सांगितली होती. (फोटो सौजन्य: अमिताभ बच्चन इन्स्टाग्राम)
-
त्यांनी म्हटले होते, “डॉन चित्रपटातील आम्ही खइके पान बनारसवाला या गाण्याचे शूटिंग करीत होतो.” (फोटो सौजन्य: अमिताभ बच्चन इन्स्टाग्राम)
-
“हे गाणे सर्वोत्कृष्ट होण्यासाठी अमिताभ बच्चन खूप उत्सुक होते.” (फोटो सौजन्य: झीनत अमान इन्स्टाग्राम)
-
“जोपर्यंत त्यांना हे गाणे परिपूर्ण वाटले नाही. तोपर्यंत ते सतत आणखी एक शॉट म्हणत राहिले आणि तोपर्यंत शूट करीत राहिले.” (फोटो सौजन्य: झीनत अमान इन्स्टाग्राम)
-
‘डॉन’ हा चित्रपट झीनत अमान आणि अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. (फोटो सौजन्य: अमिताभ बच्चन इन्स्टाग्राम)
-
“त्याबरोबरच झीनत अमान यांनी अमिताभ बच्चन यांच्या दडपणाखाली काम करण्याच्या पद्धतीचे कौतुकदेखील केले होते.” (फोटो सौजन्य: अमिताभ बच्चन इन्स्टाग्राम)
-
त्यांनी म्हटलेले, “आयुष्यातील कोणत्याही परिस्थितीला धाडस आणि सन्मानाने सामोरे जाण्याची प्रेरणा अमिताभ बच्चन यांनी दिली आहे.” (फोटो सौजन्य: अमिताभ बच्चन इन्स्टाग्राम)
-
“कोणतीही प्रसिद्ध व्यक्ती सतत चर्चेत असते. मग त्याचा राजकीय कल असो किंवा त्याच्या काही सहकलाकाराबरोबर असलेले नाते असो; ज्यामध्ये त्यांच्यावर आरोपही झाले.” (फोटो सौजन्य: अमिताभ बच्चन इन्स्टाग्राम)
-
“मात्र, अमिताभ बच्चन यांनी कायम प्रत्येक गोष्टीचा सन्मानाने सामना केला. त्यांना जो आदर मिळतो आणि प्रशंसा केली जाते, ती त्यांनी मिळवली आहे.” (फोटो सौजन्य: अमिताभ बच्चन इन्स्टाग्राम)
-
अमिताभ बच्चन आणि झीनत अमान यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांत एकत्र काम केले आहे. रोटी कपडा और मकान (१९७४), डॉन (१९७८), द ग्रेट गॅम्बलर, (१९७९), दोस्ताना(१९८०), लावारिस (१९८१), पुकार (१९८३), महान (१९८३) अशा अनेक चित्रपटांत त्यांनी एकत्र काम करीत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. (फोटो सौजन्य: अमिताभ बच्चन इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल