-
११ ऑक्टोबर रोजी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) ‘फुलवंती’ (Phullwanti) हा चित्रपट प्रदर्शित झाला.
-
अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडेने (Snehal Pravin Tarde) ‘फुलवंती’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
-
प्राजक्ताबरोबर या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani), प्रसाद ओक (Prasad Oak), वनिता खरात (Vanita Kharat), दीप्ती लेले (Dipti Lele) आदी मराठीतील नामवंत कलाकारांची फौज आहे.
-
पद्माविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘फुलवंती’ या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे.
-
या चित्रपटाचे संवादलेखन प्रवीण विठ्ठल तरडे (Pravin Tarde) यांनी केले आहे.
-
या चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये (Mahesh Limaye) यांनी सांभाळली आहे.
-
या चित्रपटाच्या प्रीमियरच्या (Movie Premiere) वेळी प्राजक्ताने घेतलेला उखाणा (Ukhana) सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) झाला आहे.
-
अँकर प्रणाली या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन प्राजक्ताचा हा व्हिडीओ (Video) पोस्ट करण्यात आला आहे.
-
‘आकाशात उडतोय पक्षांचा थवा… आकाशात उडतोय पक्षांचा थवा… लग्नाची सर्व तयारी झाली आहे… पण नवरा मुलगा तर मिळायला हवा…’ असा उखाणा प्राजक्ताने घेतला.
-
प्राजक्ताच्या ‘फुलवंती’ या चित्रपटाने आतापर्यंत १.५४ कोटी रुपयांचे कलेक्शन (Box Office Collection) केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)

‘एमपीएससी’ची राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलली जाणार ? आयोग घेणार ‘हा’ निर्णय