-
मराठी मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे जुई गडकरी.
-
अभिनेत्री जुई गडकरी नेहमी चर्चेत असते.
-
सध्या जुई ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
-
‘ठरलं तर मग’ मालिकेत जुईने साकारलेली सायली प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.
-
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय जुईला दिवाळीतला कोणता पदार्थ बनवता येत नाही, हे तुम्हाला माहितीये का?
-
नुकताच २० ऑक्टोबरला, ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाचा ‘स्टार प्रवाह’वर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पार पडला. या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरसाठी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील नायिकांचे काही खास व्हिडीओ करण्यात आले होते. ज्यामध्ये त्यांना काही प्रश्न विचारले होते.
-
असाच एक व्हिडीओ जुई गडकरीचा चर्चेत आला आहे. ज्यामध्ये जुई तिला बनवता न येणारा पदार्थ आणि बाईचा सर्वात मोठ्या शत्रूबद्दल सांगताना दिसत आहे.
-
सुरुवातीला जुईला विचारतात की, तुम्हाला कोणता पदार्थ बनवता येत नाही? तेव्हा जुई म्हणते, “घरातील नॉर्मल सर्व पदार्थ बनवतात येतात. पण, चिरोटे बनवता येत नाही.”
-
त्यानंतर अभिनेत्रीला विचारलं की, बाईचा सर्वात मोठा शत्रू कोण? तेव्हा जुई म्हणाली, “स्वतः बाईचं.” ( सर्व फोटो सौजन्य – जुई गडकरी )
‘बिग बॉस’ फेम जान्हवी किल्लेकर महिन्याचा खर्च सांगत म्हणाली, “मी दररोज…”