-
आपल्या ग्लॅमर अंदाजामुळे चर्चेत राहणाऱ्या हंसिका मोटवानीने इन्स्टाग्रामवरून एक आनंदाची बातमी दिली.
-
दाक्षिणात्य व बॉलीवूड अभिनेत्री हंसिका मोटवानीने नवीन आलिशान घर घेतलं आहे.
-
तिने गृहप्रवेशाचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे.
-
या फोटोंमध्ये तिच्या घराची झलक पाहायला मिळत आहे.
-
हंसिकाने पती सोहेल खातुरियाबरोबर गृहप्रवेश केला.
-
हंसिकाने पती सोहेल खातुरियाबरोबर नवीन घरात पूजा केल्याचं फोटोमध्ये दिसतंय.
-
नवीन घराच्या गृहप्रवेश पूजेतील काही क्षण तिने चाहत्यांबरोबर शेअर केले.
-
हंसिकाने ‘नवीन सुरुवात’ म्हणत तिच्या या घराचे काही फोटो व पूजेचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले.
-
हृतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
हंसिकाने दोन वर्षांपूर्वी सोहेल खातुरियाशी लग्न केलं. सोहेल हा घटस्फोटित होता.
-
सोहेल व हंसिका मित्र आणि बिझनेस पार्टनरल होते. नंतर ते प्रेमात पडले.
-
(सर्व फोटो – हंसिका मोटवानी इन्स्टाग्राम)

Chhaava : ‘छावा’ने मोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील सहावा चित्रपट!