-
अभिनेत्री जुई गडकरीने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.
-
जुईच्या अभिनयाचा मोठा चाहता वर्ग आहे.
-
‘पुढचं पाऊल’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली जुई सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
-
ज्याप्रमाणे तिच्या ‘पुढचं पाऊल’मधील कल्याणी भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं तसंच आता सायली या भूमिकेबरोबर होताना दिसत आहे.
-
पण, मराठी मालिकाविश्वातील आघाडीच्या या अभिनेत्रीला इम्प्रेस करण्यासाठी काय करावं लागेल? हे तुम्हाला माहितीये का?
-
नुकताच २० ऑक्टोबरला, ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाचा ‘स्टार प्रवाह’वर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पार पडला. या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरसाठी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील नायिकांचे काही खास व्हिडीओ करण्यात आले होते. ज्यामध्ये त्यांना काही प्रश्न विचारले होते.
-
असाच एक व्हिडीओ जुई गडकरीचा चर्चेत आला आहे. ज्यामध्ये जुई तिला इम्प्रेस करण्यासाठी काय केलं पाहिजे? याबद्दल सांगताना दिसली.
-
जुईला आधी विचारलं की, मुली कशाने इम्प्रेस होतात? तेव्हा जुई म्हणाली, “खरेपणाने”
-
त्यानंतर जुईला विचारलं की, तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी काय केलं पाहिजे? त्यावर अभिनेत्री म्हणाली, “खरं राहा. उगाच फेक गोष्टी गिफ्ट वगैरे देऊन करू नका. मी अजिबात इम्प्रेस होतं नाही.” ( सर्व फोटो सौजन्य – जुई गडकरी इन्स्टाग्राम )
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा