-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री व निर्माती म्हणून श्वेता शिंदेला ओळखलं जातं.
-
श्वेताने ‘लागीर झालं जी’, ‘मिसेस मुख्यमंत्री’, ‘देवमाणूस’, ‘लाखात एक आमचा दादा’ अशा लोकप्रिय मालिकांची निर्मिती केली आहे.
-
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर ‘करवा चौथ’चे फोटो शेअर केले होते. यामुळे तिचे पती संदीप भन्साळी कोण आहेत, ते काय काम करतात याबद्दल चर्चा सुरू झाली.
-
अभिनेत्रीची संदीप यांच्याशी ओळख ‘अपराधी कौन’ या हिंदी मालिकेच्या सेटवर झाली होती.
-
पुढे, या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं, मैत्रीतून प्रेम निर्माण होऊन श्वेता अन् संदीप २००७ मध्ये लग्नबंधनात अडकले.
-
संदीप यांनी CID, आहट अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे.
-
सध्या संदीप अभिनय क्षेत्रापासून दूर असले तरीही डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात सक्रिय आहेत. हिंदी भाषेवर त्यांचं विशेष प्रभुत्व आहे. याशिवाय त्यांचा व्यवसाय देखील आहे.
-
श्वेताने मूल झाल्यावर काही काळ इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला होता. यानंतर पुन्हा एकदा ती नव्या जोमाने इंडस्ट्रीत सक्रिय झाली.
-
मात्र, आता अभिनेत्री विविध नवनवीन व लक्षवेधी मालिकांची निर्माती म्हणून प्रेक्षकांसमोर आली आहे. ( सर्व फोटो सौजन्य : श्वेता शिंदे इन्स्टाग्राम )

२० फेब्रुवारी पंचांग: गुरुवारी गजानन महाराज १२ राशींना कसा देणार आशीर्वाद? तुमचा दिवस आनंदाने सुरु होणार का? वाचा राशिभविष्य