-
परिणीती चोप्रा आज तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. (Still From Movie)
-
बॉलीवूडमधील प्रसिद्द अभिनेत्री अभिनेत्रीचा जन्म २२ ऑक्टोबर १९८८ रोजी हरियाणातील अंबाला येथे झाला आहे. (Still From Movie)
-
तुम्ही तिचे चाहते असाल तर अभिनेत्रीने जबरदस्त अभिनय कौशल्य दाखवलेले काही खास सिनेमे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चित्रपटगृहांमध्ये गाजलेले हे चित्रपट आता ओटीटीवर उपलब्ध आहेत. (Still From Movie)
-
Amar Singh Chamkila
परिणीती चोप्रा आणि दिलजीत दोसांझ स्टारर चित्रपट ‘अमर सिंग चमकीला’ हा पंजाबी गायक अमर सिंग चमकिला यांचा बायोपिक आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने अमर सिंह चमकिला यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. हा उत्तम चित्रपट तुम्ही Netflix वर पाहू शकता. (Still From Movie) -
Uunchai
तिचा दुसरा चित्रपट म्हणजे ‘उंचाई’. या चित्रपटात परिणीतीने एका टूर गाईडची भूमिका साकारली आहे, जी प्रवाशांना हिमालयाच्या प्रवासात घेऊन जाते. तुम्ही हा चित्रपट Zee5 वर पाहू शकता. (Still From Movie) -
Hasee Toh Phasee
परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर ‘हसी तो फसी’ या चित्रपटाच्या नावाचाही यात समावेश आहे. या चित्रपटात परिणीतीने मीता नावाची भूमिका साकारली आहे. चित्रपटात एक रोमँटिक ड्रामा दाखवण्यात आला आहे आणि तुम्ही हा सिनेमा नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. (Still From Movie) -
Shuddh Desi Romance
सुशांत सिंह राजपूत आणि परिणीती यांचा ‘शुद्ध देसी रोमान्स’ हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्रीने गायत्रीची भूमिका साकारली होती. हा एक रोमँटिक कॉमेडी ड्रामा आहे, जो तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता. (Still From Movie) -
Ishaqzaade
परिणीती चोप्राचा ‘इशकजादे’ हा तिचा पहिला मुख्य भूमिका असलेला चित्रपट आहे. या चित्रपटात ती झोयाच्या भूमिकेत दिसली होती, जी एका हिंदू धर्माच्या मुलाच्या प्रेमात पडते. या चित्रपटातील परिणीतीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. इशकजादे, तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता. (Still From Movie) -
Ladies vs Ricky Bahl
‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ हा परिणीतीचा डेब्यू चित्रपट आहे. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा ड्रामा चित्रपट तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता. (Still From Movie)
हेही पाहा – क्रिती सेनॉनने ‘Do Patti’ चित्रपटातील ‘हिर’ कशी आहे हे सांगत पोस्ट केले जबरदस्त स्टायलिश Photos

Champions Trophy Final: भारताच्या विजयाचा पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, यजमान देशात होणार नाही चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना