-
गायक अभिजीत सावंत बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाला होता. या पर्वाचा तो उपविजेता ठरला आहे. आता त्याने एका मुलाखतीत, मुलींना गाण्यात आवड आहे का? यावर वक्तव्य केले आहे. (फोटो सौजन्य: अभिजीत सावंत इन्स्टाग्राम)
-
अभिजीत सावंतने नुकतीच ‘लोकशाही मराठी फ्रेंडली’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्याला विचारण्यात आले की, तुझी मुलगी म्हणाली होती की इंडियन आयडॉल जिंकलास तेव्हा आम्ही नव्हतो; पण आता बिग बॉसची ट्रॉफी जिंकताना आम्हाला तुला पाहायचंय. तर त्यांची शोनंतर प्रतिक्रिया काय होती? आणि त्यांना गाण्यात आवड आहे का? (फोटो सौजन्य: अभिजीत सावंत इन्स्टाग्राम)
-
यावर बोलताना त्याने म्हटले, “दोघींना म्युझिकमध्ये आवड आहे, त्यामुळे आता फक्त मी त्यांना शिकवतोय. (फोटो सौजन्य: अभिजीत सावंत इन्स्टाग्राम)
-
“कारण जर उद्या त्यांना प्रोफेशन म्हणून गाणे निवडायचे असेल तर त्या तयार असल्या पाहिजेत.” (फोटो सौजन्य: अभिजीत सावंत इन्स्टाग्राम)
-
“पण, त्यांचा अभ्याससुद्धा चांगला आहे. लहान मुलगी जास्त ॲक्टिव्ह आहे. मोठी माझ्यासारखी आहे, जास्त शांत असते. पण, तीचं ती काम व्यवस्थित करते, त्यामुळे ते कॉम्बिनेशन चांगलं आहे.” (फोटो सौजन्य: अभिजीत सावंत इन्स्टाग्राम)
-
पुढे बोलताना त्याने म्हटले, “ज्यावेळी बिग बॉसचा विजेता घोषित केला त्यावेळी मी त्यांनाच बघत होतो, कारण ते कसं घेतील किंवा या गोष्टी त्या कशा पद्धतीनं स्वीकारतील असं मला वाटत होतं.” (फोटो सौजन्य: अभिजीत सावंत इन्स्टाग्राम)
-
“पाच मिनिटांसाठी त्यांना वाईट वाटलं, निराशा होती; पण त्यानंतर त्या व्यवस्थित झाल्या.” (फोटो सौजन्य: अभिजीत सावंत इन्स्टाग्राम)
-
“मलाच टेन्शन आलं की इतकं कसं तुम्ही नॉर्मल घेतलं”, असे अभिजीतने म्हटले आहे.(फोटो सौजन्य: अभिजीत सावंत इन्स्टाग्राम)
-
जेव्हा रितेश देशमुखने बिग बॉसच्या घरात जात स्पर्धकांना सरप्राइज दिलं होतं. (फोटो सौजन्य: अभिजीत सावंत इन्स्टाग्राम)
-
अभिजीतला आहना आणि स्मिरा यांचा व्हिडीओ दाखवला होता, त्यावेळी तो भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. (फोटो सौजन्य: अभिजीत सावंत इन्स्टाग्राम)
-
याबरोबरच फॅमिली वीकमध्ये अभिजीतची पत्नी आणि दोन मुलींनी घरात हजेरी लावली होती. (फोटो सौजन्य: अभिजीत सावंत इन्स्टाग्राम)
-
उपविजेता ठरलेला अभिजीत सावंत विविध कारणांमुळे सध्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य: अभिजीत सावंत इन्स्टाग्राम)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड