-
सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस १८ या शोची सध्या चांगलीच चर्चा आहे.
-
लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सातत्याने धमक्या मिळत असतानाही सलमान या शोचे शूटिंग करत आहे.
-
नुकत्याच झालेल्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये सलमान खान चिंतेत दिसत होता. मात्र चाहत पांडेने सलमान खानच्या चेहऱ्यावर हसू आणलं.
-
या एपिसोडमध्ये चाहतने तिला जोडीदारात कोणते गुण हवे ते सांगितलं आणि स्पर्धक करणवीर मेहराचं कौतुक केलं.
-
मग चाहत सलमान खानला म्हणाली “सर, तुम्ही माझ्याशी लग्न कराल का?”
-
यावर सलमान हसला आणि चाहतला म्हणाला, “तू जे गुण सांगितलेत, त्यापैकी एकही गुण माझ्याकडे नाही. तसेच माझं तुझ्या आईबरोबर अजिबात जमणार नाही.”
-
Who is Chahat Pandey: सलमानला शोमध्ये प्रपोज करणारी चाहत पांडे कोण आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर चाहतबद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात.
-
२५ वर्षांची चाहत पांडे ही मुळची मध्य प्रदेशमधील दामोह येथील आहे.
-
चाहत ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे.
-
तिने २०१६ मध्ये ‘पवित्र बंधन’ या टीव्ही शोमधून तिच्या करिअरची सुरुवात केली.
-
यानंतर ती ‘नथ जेवर या जंजीर’, ‘हमारी बहू सिल्क’, ‘नागिन 2’ आणि ‘तेनाली राम’ सारख्या शोमध्ये झळकली.
-
चाहत तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तसेच तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.
-
मालिकांमध्ये अभिनय करण्याबरोबर चाहतने राजकारणातही नशीब आजमावले. मात्र तिला यश आले नाही.
-
चाहतने आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करून २०२३ साली निवडणूक लढवली होती.
-
ती मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत दामोह विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरली. पण तिचा पराभव झाला.
-
बिग बॉसमुळे चर्चेत असलेली चाहत पांडे अनेकदा वादात राहिली आहे.
-
२०२० मध्ये तिच्यावर मामाच्या घराची तोडफोड करून मारहाण केल्याचा आरोप होता.
-
या घटनेनंतर पोलिसांनी चाहतला अटक करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती तिथून आधीच पळून गेली होती.
-
त्यानंतर पोलिसांनी तिला पकडून न्यायालयात हजर केलं होतं, चाहतला तुरुंगातही जावं लागलं होतं.
-
या सगळ्या वादानंतरही चाहतने अभिनय करणं सुरूच ठेवलं. आता ती छोट्या पडद्यावरील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
(सर्व फोटो – चाहत पांडे इन्स्टाग्राम)

Udayanraje Bhosale on Waghya Statue: “एवढ्या लांब कानाचा कुत्रा…”, वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावर उदयनराजेंचा संताप; म्हणाले, “द्या दणका…”