-
‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपून दोन आठवडे उलटून गेले असले तरी अजूनही चर्चा मात्र कायम आहे.
-
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील सदस्य सध्या खूप चर्चेत आहेत. ठिकठिकाणी हे सदस्य मुलाखती देताना दिसत आहेत.
-
नुकतीच पंढरीनाथ कांबळेने ‘महा एमटीबी’ला मुलाखत दिली. यावेळी त्याने पंढरीनाथ नावामागचा किस्सा सांगितला.
-
पंढरीनाथ कांबळेला विचारलं की, पंढरीनाथ हे नाव कोणी ठेवलं?
-
तेव्हा पंढरीनाथ म्हणाला, “नावाची एक गंमत आहे.”
-
“मी जेव्हा आईच्या पोटात होतो. तेव्हा माझ्या आजोबांनी विठ्ठलाला सांगितलं होतं की, जर मुलगा झाला तर त्याला तुझं नाव ठेवीन,” असं पंढरीनाथ म्हणाला.
-
पुढे पंढरीनाथ म्हणाला की, माझ्या आजोबांचं नाव विठोबा, तर माझ्या बाबांचं नाव गोविंद आहे. मग मी झालो. त्यानंतर माझं नाव पंढरीनाथ ठेवलं.
-
तसंच पंढरीनाथ कांबळेला पॅडी हे नाव त्याचा एका मित्राने ठेवलं. ज्या नावाने पंढरीनाथ कांबळे खूप प्रसिद्ध आहे.
-
( सर्व फोटो सौजन्य – पंढरीनाथ कांबळे इन्स्टाग्राम )

Amol Kolhe: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हे यांचे धक्कादायक विधान; शरद पवारांच्या सूचनेबाबत म्हणाले…