-
संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या हास्य मालिकेतून अभिनेता पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) घराघरात लोकप्रिय झाला.
-
आज (२५ ऑक्टोबर) रोजी पृथ्वीकने लग्नगाठ बांधत (Wedding) नव्या आयुष्याला सुरुवात केली.
-
पृथ्वीकने मैत्रीण (Friend) प्राजक्ता वायकुळबरोबर (Prajakta Vaikul) लग्नगाठ बांधली.
-
फोटोंना ‘एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने, साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने!’ असे कॅप्शन देत पृथ्वीकने इन्स्टाग्रामवर ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली.
-
लग्नासाठी पृथ्वीक व प्राजक्ताने अतिशय सुंदर लूक (Wedding Look) केला होता.
-
पृथ्वीकने लग्नात पांढऱ्या रंगाचा कुर्ता (White Kurta) व धोतर (Dhotar) परिधान केले होते.
-
पृथ्वीकची पत्नी प्राजक्ताने लग्नात क्रिम व सोनेरी रंगाची वेगळ्या पद्धतीने साडी (Cream Golden Colour Saree) नेसली होती.
-
पृथ्वीक व प्राजक्ताच्या लग्नातील फोटोंवर सेलिब्रिटींबरोबरच चाहत्यांनीदेखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पृथ्वीक प्रताप/इन्स्टाग्राम)
![Chhaava Public Review](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Chhaava-Public-Review.jpg?w=300&h=200&crop=1)
Chhaava : कसा आहे ‘छावा’ चित्रपट? विकी कौशलचा सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षक म्हणाले…