-
बॉलीवूडमध्ये हळू हळू चित्रपटांच्या थीम आणि पात्रांमध्ये बदल होत गेला परंतु असं असलं तरी दुहेरी भूमिका असणाऱ्या चित्रपटांनी नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. क्रिती सेनॉन तिच्या आगामी ‘दो पत्ती’ या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे, ज्यामध्ये ती दोन जुळ्या बहिणींची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातून क्रिती पहिल्यांदाच निर्माती म्हणूनही पदार्पण करत आहे. ‘दो पत्ती’ आज नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आपण जाणून घेऊया त्या बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल ज्यांनी आपल्या करिअरमध्ये दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. (Still From Film)
-
दीपिका पदुकोण
दीपिकाने ‘चांदनी चौक टू चायना’मध्ये सखी आणि सुजीची भूमिका साकारली होती. याशिवाय, ओम शांती ओममध्ये तिने शांतीप्रिया आणि संध्या उर्फ ‘सँडी’ ची भूमिका साकारली होती, जी तिच्या करिअरमधील सर्वात प्रसिद्ध पात्रांपैकी एक आहे. (Still From Flim) -
बिपाशा बसू
‘धूम २’मध्ये बिपाशाने शोनाली बोस आणि मोनाली बोसच्या भूमिका साकारल्या होत्या. दोन्ही पात्रांनी चित्रपटात एक खास ट्विस्ट आणला आहे, ज्यामुळे कथा आणखी मनोरंजक बनते. (Still From Film) -
काजोल
काजोलने ‘दुष्मन’मध्ये नैना आणि सोनिया नावाच्या जुळ्या बहिणींची भूमिका साकारली होती. एक पात्र निष्पाप आहे, तर दुसरी बहिण अतिशय लढाऊ व्यक्तिमत्त्व आहे. (Still From Film) -
कंगना रणौत
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतने ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली होती. यात तिने तनु आणि दत्तो नावाची दोन पात्रे साकारली आणि या अभिनयासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. (Still From Film) -
माधुरी दीक्षित
‘संगीत’मध्ये माधुरीने आई आणि मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील दुहेरी भूमिकेचं हे एक अद्वितीय उदाहरण आहे. (Still From Film) -
हेमा मालिनी
हेमा मालिनी यांनी ‘सीता और गीता’मध्ये जुळ्या बहिणींची भूमिका साकारली होती. एक बहीण साधी आणि विनम्र आहे, तर दुसरी धाडसी आणि लढाऊ आहे. अभिनेत्रीच्या कारकिर्दीतील सुपरहिट चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा समावेश होतो. (Still From Film) -
शर्मिला टागोर
‘मौसम’मध्ये शर्मिलाने चंदा थापा आणि तिची मुलगी काजिली यांची भूमिका साकारली होती. चित्रपटातील दोन्ही पात्रांच्या भावना आणि संघर्ष प्रेक्षकांच्या मनाला भिडला होता. (Still From Film) -
श्रीदेवी
श्रीदेवीने ‘चालबाज’मध्ये अंजू आणि मंजूची भूमिका साकारली होती, ज्या लहानपणीच वेगळ्या होतात. तिने साकारलेल्या या पात्रांमध्ये एक निरागसता आणि खेळकरपणा होता, ज्याने प्रेक्षकांची मने जिंकली. (Still From Film) -
नर्गिस
नर्गिसने ‘अनहोनी’मध्ये मोहिनी आणि रूप नावाच्या बहिणींची भूमिका साकारली होती. हा चित्रपट एक सायकोकिलर ड्रामा होता ज्याताल दोन्ही पात्रांमध्ये खूप फरक होता. (Still From Film)
हेही पाहा – नताशा स्टॅनकोविकचे राखाडी रंगाच्या साडीमधील फोटो व्हायरल, ‘हे’ रॅप गाणं झालं प्रदर्शि…

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही